छत्रपती ग्रुप प्रेस बातमी

छत्रपती ग्रुप प्रेस बातमी

छत्रपती ग्रुपचा आज निषेध मोर्चा
कोल्हापूर, ता.१६ः राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची बदनामी करून मराठा आरक्षणाबाबत संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्या, स्वयंघोषित मराठा समन्वयक दिलीप पाटील यांच्या घरावर आज, बुधवारी सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहीती छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले,‘दिलीप पाटील हे मराठा संघटनेमध्ये कोणत्याही पदावर नाहीत. असे असताना ते आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची वारंवार बदनामी करत आहेत. तसेच मराठा आरक्षणाबाबत संभ्रमावस्था निर्माण करत आहेत. आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मोठे योगदान दिले आहे. असे असताना स्वयंघोषित मराठा समन्वयक दिलीप पाटील हे स्वतःच्या प्रसिध्दीसाठी त्यांच्यावर बेताल वक्तव्य करत आहेत. छत्रपती ग्रुपच्यावतीने याचा निषेध करत असून आज त्यांच्या घरावर मोर्चा काढणार आहे. सकाळी ११ वाजता रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून दिलीप पाटील यांच्या घरावर मोर्चा निघणार आहे.’ पत्रकार परिषदेस रोहित मलमे, वैभव भोसले, विशाल पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com