केएमटी उत्पन्न

केएमटी उत्पन्न

केएमटीची झोळी झाली दुबळी
कमी बससंख्येही उत्पन्न जैसे थे; प्रवाशांची काळजी करणार केव्हा?

उदयसिंग पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः आयुर्मान संपलेल्या बस बंद केल्यानंतर कमी बससंख्येतही केएमटीचे प्रतिकिलोमीटरमागे येणारे उत्पन्न (ईपीके) जैसे थे आहे. फेब्रुवारीत ६५ बससंख्येत ५३ ईपीके होता. एप्रिलमध्ये ५८ बससंख्येत तो ५२ वर आहे. यातून केएमटी ही प्रवाशांची गरज दिसत आहे. योग्य मार्गावर बस सोडण्याबरोबरच योग्य नियोजन केल्यास प्रवाशी केएमटीपाठीमागे राहतील असेच हे चित्र आहे. पण ‘देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी’ अशी अवस्था केएमटी प्रशासनाची आहे.
केएमटीचा बसताफा १२९ वरून विविध कारणांनी आता ५८ वर आला आहे. निम्म्या बस कमी झाल्याने उत्पन्नावर परिणाम होईल, असे वाटत होते. वेळेत बस न येणे, योग्य मार्गावर बस संख्या कमी अशा अवस्थेने प्रवाशांची संख्या जास्त असूनही केएमटीला ती उत्पन्नात वळवता आली नाही. कमी झालेली कर्मचारी संख्या, स्पेअरसाठीची ओरड, संघटनांचे राजकारण अशा अनेक कारणांनी जास्तीत जास्त प्रवाशी ओढण्यापेक्षा दररोजचा दिवस ढकलायचा ही प्रवृत्ती केएमटीत सर्व पातळीवर बोकाळली आहे. अनेक प्रवाशी या मार्गावर बस येत नाहीत अशी कायम तक्रार करूनही ढिम्म प्रशासन वेळापत्रकात बदल करत नव्हते. वर्षानुवर्षे चाललेले वेळापत्रक ओढून ताणून राबवले जात होते. त्यातून केएमटीला फटका बसत आहे हे दिसत असूनही अनेकजण कारणांची जंत्री सोडून रिकामी फिरत होते.
बससंख्या कमी झाल्यानंतर एप्रिलमध्ये उत्पन्नावर परिणाम होणार हे स्पष्ट दिसत होते. शाळा-कॉलेजला सुटी हे त्यातील प्रमुख कारण होते. पण, कमी बस असतानाही मार्गांचे नियोजन करण्याबरोबरच तोट्यातील फेऱ्या कमी करून त्यावरील बस उत्पन्नाच्या मार्गावर सोडण्यासाठी प्रशासनावर आणलेल्या दबावाने चित्र वेगळे दिसत आहे. कमी बससंख्येतही ईपीके स्थिर आहे. यामुळे प्रवाशांची संख्या भरपूर आहे, त्या मार्गावर बस धावत आहेत असेच दिसते. तोट्यातील तसेच गरज नसलेल्या मार्गावर बस फिरवल्या नसत्या तर त्यावेळच्या बससंख्येचा ईपीके आणखी वाढून उत्पन्नात भर पडली असती. त्यादृष्टीने काही झालेले नव्हते.

प्रतिकिलोमीटरमागे उत्पन्न (ईपीके)
फेब्रुवारी

बससंख्या
६५
प्रतिबस उत्पन्न
११२१६
ईपीके
५३
प्रतिबस धाव
२१३
...............................

एप्रिल

बससंख्या
५८
प्रतिबस उत्पन्न
११७५०
ईपीके
५२
प्रतिबस धाव
२२५
........................

कोट
शहरातील प्रवाशांना केएमटीची गरज आहे. अनेक थांब्यांवर प्रवासी ताटकळत उभे राहिलेले असतात. बसमधील गर्दीत वृद्ध नाईलाजाने उभे राहून प्रवास करतात. जे तोट्यातील मार्ग आहेत, त्यावरील फेऱ्या कमी करून त्या जादा प्रवासी असलेल्या मार्गावर पाठवण्याची लवचिकता हवी. त्यासाठी दररोज नवीन नियोजन करण्याची क्षमता असलेल अधिकारी हवेत. त्यातून उत्पन्नात लागलीच वाढ होणार नाही पण तोटा कमी होऊ शकतो.
-ॲड. बाबा इंदूलकर, कॉमन मॅन संघटना.
..............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com