प
पंचगंगा प्रदूषण अहवाल सोमवारी होणार सादर

प पंचगंगा प्रदूषण अहवाल सोमवारी होणार सादर

जिल्‍हा परिषद ...लोगो
...

पंचगंगा प्रदूषण अहवाल
सोमवारी होणार सादर

कोल्‍हापूर, ता.१९: पंचगंगा नदीचे प्रदूषण व त्याबाबत केलेल्या उपाययोजनांचा अहवाल सोमवारी (ता.२२) हरित लवादाकडे सादर केला जाणार आहे. नदीकाठच्या गावांचे सर्‍‍व्‍हेक्षण करण्यात आले असून त्याचा अहवाल तयार झाला असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) अरुण जाधव यांनी दिली.

पंचगंगा नदी प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले होते. याबाबत हरिद लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार महापालिका, जिल्‍हाधिकारी व जिल्‍हा परिषद तसेच इचलकरंजी महापालिका यांच्याकडून अहवाल मागवण्यात आला होता. नदीकाठच्या गावांचा अहवाल जिल्‍हा परिषदेकडून तयार करण्यात आला आहे. तालुक्याचे गट विकास अधिकारी, शाखा अभियंता यांनी पाहणी करुन हा अहवाल सादर केला आहे. नदीकाठच्या गावातून निघणारे सांडपाणी व घनकचरा यावर कशापध्‍दतीने प्रक्रिया केली जात आहे, कोणत्या उपाययोजन राबवल्या गेल्या आहेत, याची माहिती दिली जाणार आहे.
गेली काही दिवस जिल्‍हा परिषदेचे अधिकारी नदीकाठच्या गावांना भेटी देवून माहिती संकलित करत होते. या माहितीचे एकत्रिकरण करण्यात आले आहे. उपलब्‍ध माहितीच्या आधारे अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालावर मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांच्याकडे चर्चा करण्यात आली. अहवालाबाबत श्री.चव्‍हाण यांनी काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार बदल करुन अंतिम अहवाल राज्याच्या सचिवांमार्फत राष्‍ट्रीय हरित लवादाकडे सादर केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com