ए.एस.ट्रेडर्स ८३ हजार युजर आयडी

ए.एस.ट्रेडर्स ८३ हजार युजर आयडी

ए.एस.ट्रेडर्समध्ये नाव नसलेली
सुमारे १२३१ कोटींची गुंतवणूक

तब्बल ८३ हजार युजर आयडींचा वापर केल्याचे उघड


कोल्हापूर, ता. १९ ः ए. एस. ट्रेडर्समध्ये नाव नसलेली सुमारे १२३१ कोटींची गुंतवणूक असल्याचे तपासात समोर आले आहे. यासाठी तब्बल ८३ हजार युजर आयडींचा वापर केल्याची माहिती पुढे आली आहे. जप्त केलेल्या उंची मोबाईल हॅण्डसेट आणि उंची किंमतीच्या लॅपटॉपमध्ये ही माहिती मिळाली आहे. ही माहिती मिळविण्यासाठी पुण्यातील सायबर सेलमधून तज्ज्ञांना बोलविण्यात आले आहे. त्यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे. अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक औदुंबर पाटील यांनी आज पत्रकारांना दिली.
ए.एस.ट्रेडर्स मध्ये गुंतवणूकदारांची सुमारे पाच हजार कोटींची फसवणूक झाल्याची शक्यता निरीक्षक पाटील यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे कालच यातील संचालक विक्रम नाळेच्या विरोधात सुमारे दहा हजार पानांचे दोषारोप पत्र विशेष न्यायालयात दाखल केले आहे. उर्वरीत तपास सुरू असून साधारण १२३१ कोटींची गुंतवणूक नेमकी कोणी केली आहे याची माहिती जप्त केलेल्या एका लॅपटॉप आणि मोबाईल हॅण्डसेटमध्ये मिळणार आहे. स्क्रिनवर केवळ ए.एस असे म्हणून त्या पुढे कोट्यवधींचे आकडे आहेत. ही गुंतवणूक नेमकी कोणाची आहे, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. किंबहुना यातील कोणीही तक्रार किंवा फिर्यादसुद्धा दिलेली नाही.
शेतीपूरक व्यवसाय म्हणून असलेल्या खात्यांवरील जीएसटी सुद्धा शासनाला भरण्यात आला आहे. प्रत्यक्षात व्यवहार शेअर मार्केटमधील केले आहेत. त्यामुळे शासनाचीही फसवणूक झाल्याची माहिती आता पुढे आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात एक व्यवसाय आणि दाखविला दुसराच अशी स्थिती असल्याचेही तपासात पुढे आल्याचेही निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com