जळीतग्रस्त शेतकऱ्याला ‘रवळनाथ’कडून मदत

जळीतग्रस्त शेतकऱ्याला ‘रवळनाथ’कडून मदत

chd231.jpg
04478
आपुटहोळवाडी : दत्तू सावंत यांना मदतीचा धनादेश एम. एल. चौगुले यांनी दिला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
----------------------------------------------
जळीतग्रस्त शेतकऱ्याला ‘रवळनाथ’कडून मदत
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २४ : कानूर खुर्दपैकी आपुटहोळवाडी (ता. चंदगड) येथील जळीतग्रस्त शेतकरी दत्तू विठू सावंत यांना श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी लि. आजरा यांच्यावतीने २५ हजाराची मदत दिली.
आठ दिवसांपूर्वी सावंत यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीत २२ शेळ्या आणि ८ पिले मिळून मृत्यूमुखी पडले. शेळ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचा मुलगा हिरोजी दत्तू सावंत जखमी झाला. माहिती समजताच रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी सावंत कुटुंबियांची समक्ष भेट घेऊन मदतीचा धनादेश दिला. संस्थेचे मानद ब्रँड अॅम्बेसिडर डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी सुरु केलेल्या ''चांगुलपणाची चळवळ'' अंतर्गत ही मदत दिली. संचालक प्राचार्य आर. एस. निळपणकर, प्रा. डॉ. दत्ता पाटील, चंदगड शाखा चेअरमन पुष्पा नेसरीकर, शाखा सल्लागार प्रा. डॉ. अजित घोरपडे, सीईओ डी. के. मायदेव, शाखाधिकारी किरण कोडोळी, कानुरचे माजी सरपंच तुकाराम गावडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com