केएमटी तोटा

केएमटी तोटा

04490

प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे
केएमटी कोट्यवधीच्या तोट्यात

सर्वपक्षीय समितीचा आरोप; महिन्यात सुधारणा करण्याचे आश्‍वासन

कोल्हापूर, ता. २३ : केएमटीला ना नफा ना तोट्यात सेवा चालवण्यासाठी प्रति किलोमीटर किमान ५२ रूपयांचे उत्पन्न हवे. पण, सध्या २४ पैकी १४ मार्ग तोट्यात आहेत. हा तोटा कमी करण्यासाठी तातडीने पाऊले उचला असे निवेदन कोल्हापूर शहर सर्वपक्षीय अन्याय निवारण समितीने केएमटी प्रशासनाला दिले.
अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी एक महिन्यात तोटा कमी करण्यासाठी पाऊले उचलली जातील असे आश्‍वासन दिले.
समितीच्या निवेदनात म्हटले आहे, महिन्याला केएमटीला महापालिकेकडून दोन कोटींचे अनुदान घ्यावे लागते. वर्षभर तोट्यातील मार्ग बंद करा, अशा विनवणी करूनही प्रस्ताव, ठराव, उपसमिती यांच्या घोळात निर्णय होत नाहीत. कागदी घोडे हलविले जातात. दुसरीकडे वाहक नाहीत, म्हणून यंत्रशाळेत बस उभ्या राहतात. वाहकांना डिझेल भरण्याचे काम लावले जाते. पार्किंगमध्ये उत्पन्न कमी आणि ते चालवणाऱ्या चालक, वाहकांचा पगार जास्त आहे. पासमध्ये गोंधळ, बसथांब्याशेजारी उभ्या असणाऱ्या वडाप व्यवसायावर निर्बंध घालायला हवेत. ज्यांना व्यवसायातील माहिती नाही, त्यांच्या हाती धुरा आहे. यावेळी आर. के. पोवार, अॅड. बाबा इंदूलकर, अशोक भंडारे, अनिल कदम, चंद्रकांत पाटील, दिलीप देसाई आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com