निवेदन

निवेदन

04508

जातीचा दाखल्यासाठी साठ वर्षे
पुरावाच्या अट रद्द करावी

नाथपंथी समाज महासंघाचे सतेज पाटील यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः नाथ समाजाच्या अडीअडचणीसंदर्भात आज नाथपंथी समाज महासंघातर्फे आमदार सतेज पाटील यांना निवेदन देण्यात आले. नाथ समाजाचे जिल्हाध्यक्ष शिवराम डवरी यांच्या हस्ते हे निवेदन दिले. निवेदनातील मागण्या अशा ः समाजाला जातीचा दाखला मिळण्यासाठी साठ वर्षाचा पुरावा मागितला जातो ती अट रद्द करावी. समाजातील विविध कार्यक्रम घेता यावेत, यासाठी जिल्हास्तरावर नाथ भवन बांधावे. गाव स्तरावर दफनभूमीसाठी असणाऱ्या जागा ग्रामपंचायतीकडून काढून घेतल्या आहेत, त्या पुन्हा समाजाला मिळाव्या. गाव स्तरावर ग्रामदेवतेचे संपूर्ण कामकाज छबिना काढणे, आरत्या म्हणणे, गोंधळ घालने, इत्यादी कामे डवरी समाज कडून केली जातात. तरी पश्चिम विभाग देवस्थान कमिटीवर डवरी समाजाचा एक प्रतिनिधी अथवा सदस्य नेमण्यात यावा. जिल्हास्तरावर नाथपंथी डवरी समाज करिता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. दहावी बारावीची परीक्षा शुल्क पूर्वीप्रमाणे परत मिळावी व शिष्यवृत्ती नियमित मिळावी. हेच निवेदन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनाही देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सर्जेराव पोवार, सचिव डवरी, संजय डवरी, सुनील यादव, केरबा डवरी, कोंडीबा डवरी - तारळे, अनिल डवरी - मरळीकर, सचिन जाधव, माजी नगरसेवक महेश जाधव, मुरलीधर जगताप, गोरखनाथ डवरी, संतोष डवरी, संदीप जाधव, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख प्रदीप जाधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com