करवीर कामगार संघ

करवीर कामगार संघ

04494

करवीर कामगार संघाचा
जिल्हा परिषदेवर मोर्चा

अंशकालीन स्त्री परिचरांना कायम करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार अंशकालीन स्त्री परिचरांना नोकरीत कायम करावे, तसेच कायम कामगार वेतन श्रेणीनुसार वेतन द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी करवीर कामगार संघाने आज मोर्चा काढला. येथील दसरा चौकातून सुरू झालेला मार्चा घोषणा देत जिल्हा परिषदेवर गेला. तेथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना निवेदन दिले.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात अंशकालीन स्त्री परिचर काम करतात. त्या पूर्ण वेळ काम करीत आहेत. तरीही त्यांना अंशकालीन कर्मचारी म्हणून गणले जाते. या महिला अनेक वर्षांपासून काम करीत असूनही त्यांना प्रशासनाकडून दुजाभाव केला जातो. त्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात यापूर्वीही प्रशासनाकडे अनेक निवेदने दिली होती. मात्र, त्याची दखल घेतली नाही म्हणून आज मोर्चाद्वारे विविध मागण्यांचे निवेदन देत आहोत, असेही निवेदनात म्हटले आहे.
संघाचे सचिव बाबासाहेब पोवार, संतोष पाटील, शुभांगी साबळे, वंदना गुरव, लता सावरदकर, छाया भगत आदीच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.

मागण्या अशा
- अंशकालीन स्त्री परिचरांना सेवेत कायम करा
- सरळ सेवा भरतीत वर्ग ३ वर्ग ४ मध्ये नियुक्ती द्या
- दरमहा १८ हजार वेतन देण्यात यावे
- कोविड प्रोत्साहन भत्ता द्यावा
- रजा, सुटी, प्रवास, भत्ता असे लाभ द्या
- भविष्य निर्वाह निधी, पेन्शन योजना लागू करा
- आरोग्य संचालकांच्या आदेशानुसार
१० हजार तूर्त एकत्रित वेतन द्यावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com