इचल : राजेंद्रसिंह राणा संवाद

इचल : राजेंद्रसिंह राणा संवाद

04615
इचलकरंजी ः जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी समाजवादी प्रबोधिनीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी प्रसाद कुलकर्णी, प्रताप होगाडे, संदीप चोडणकर आदी उपस्थित होते.
....
पंचगंगा प्रदूषणप्रश्नी ''जन आयोगा''ची गरज

जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणाः समाजवादी प्रबोधिनीमध्ये साधला सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद

इचलकरंजी, ता.२४ ः ‘दहा-बारा वर्षांपूर्वीची काविळीदरम्यानची पंचगंगा नदीची स्थिती आजही जैसे-थे आहे. अतिक्रमण, प्रदूषण या समस्यांनी पंचगंगा नदी ग्रस्त आहे. लोकांचे नेमलेले सरकारी विश्वस्त नदीसाठी काम करणार नसतील तर आता लोकांनी पंचसूत्री अवलंबली पाहिजे. जनसुनावणी, प्रबोधन, प्रदूषणमुक्ती, पूरमुक्ती, पर्यावरणपूरक जीवनशैली अशी पंचसूत्री नदीला अमृतवाहिनी बनविण्यासाठी असेल. या प्रत्येक घटकावर योग्य पद्धतीने काम करण्यासाठी ''जन आयोग'' नेमण्याची गरज आहे’, असे मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केले. येथील समाजवादी प्रबोधिनीमध्ये इचलकरंजीतील विविध सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
पंचगंगेच्या प्रदूषणावर ठोस उपाय योजनांची सविस्तर भूमिका राणी यांनी यावेळी मांडली. ते म्हणाले, ‘सरकारी नोकर हे सरकारच्या विरोधात जात नसतात. त्यामुळे सरकार, राजकिय आणि उद्योग यांचा दबाव नसलेला पाचजणांचा जन आयोग तयार करण्याची गरज आहे. त्याशिवाय पंचगंगेचे शुध्दीकरण होऊ शकत नाही. `पंचगंगा` लोकांचा आवाज झाल्याशिवाय तिच्या शुद्धीकरणाचा प्रश्न सुटू शकत नाही. हे आपण समजून घेतले पाहिजे. गेल्या दहा वर्षापासून पंचगंगा नदीची स्थिती आहे तशीच आहे. हे चांगले लक्षण नाही. पुढच्या पिढीला आपण बंगले, गाडी ,संपत्ती द्याल पण शुद्ध पाणी कसे देणार हा प्रश्न आहे. नदीला अमृतवाहिनी बनवायचे असेल तर स्थानिकांचा लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ’
पर्यावरण तजज्ञ संदीप चोडणकर म्हणाले, ‘२०१२ च्या काविळीच्या साथीमध्ये चाळीस लोक दगावले व दहा हजार लोक बाधित झाले. त्याला अकरा वर्षे होऊन गेली. तरीही त्याची जनसुनावणी आजतागायत झालेली नाही. प्रदूषण नियंत्रणातील चुकीच्या संकल्पना राबविल्या गेल्यामुळे नदीचे प्रदूषण वाढतच चालेल आहे. राणा यांची पंचसूत्री प्रभावीपणे राबविल्यास पुढच्या पिढीला त्यांची नदी आपण सुस्थितीत देता येणार आहे. नदीला अमृतवाहिनी बनविण्याचा संकल्प प्रत्येकाचा झाला तरच हे शिवधनुष्य उचलणे शक्य आहे.’
डॉ.राजेंद्र सिंह राणा यांनी श्रोत्यांच्या विविध प्रश्नांचे निरसनही केले. यावेळी दीपक भोसले, अभिजीत पटवा, अरविंद धरणगुत्तीकर, अभिमन्यू कुरणे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मंचावर प्रताप होगाडे उपस्थित होते.
...

`पंचगंगा` लोकांचा आवाज बनावा

डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, `पंचगंगा` लोकांचा आवाज झाल्याशिवाय तिच्या शुद्धीकरणाचा प्रश्न सुटू शकत नाही. हे आपण समजून घेतले पाहिजे. गेल्या दहा वर्षापासून पंचगंगा नदीची स्थिती आहे तशीच आहे. हे चांगले लक्षण नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com