कोल्हापूर हायकर्स पत्रकार परिषद

कोल्हापूर हायकर्स पत्रकार परिषद

04646
...

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी
सात ठिकाणांहून आणले जल
---
‘कोल्हापूर हायकर्स’ची मोहीम
कोल्हापूर, ता. २४ ः रायगडावर होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी विविध सात ठिकाणांहून पवित्र जल कोल्हापूर हायकर्सने संकलित केले आहे. यावर्षी या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे हिमालयातील पवित्र नद्यांबरोबरच सह्याद्रीतील महत्त्वपूर्ण ठिकाणे तसेच छत्रपती शिवरायांचे जन्मठिकाण, त्यांनी केलेल्या राज्यविस्ताराची ठिकाणे आणि पवित्र नद्या अशा महत्त्वपूर्ण ठिकाणावरून पवित्र जल आणले असल्याची माहिती ‘कोल्हापूर हायकर्स’चे संस्थापक सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, की स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर १६७४ मध्ये राज्याभिषेक होऊन प्रथमच एक मराठा योद्धा राजा छत्रपती म्हणून नावारूपास आला. याच सोहळ्याची आठवण संपूर्ण महाराष्ट्रास राहावी, यासाठी अनेक वर्षांपासून माजी खासदार संभाजीराजे यांनी रायगडावर साऱ्या मराठा मावळ्यांच्या साक्षीने या सोहळ्याची झलक संपूर्ण महाराष्ट्राला दिली आहे. सह्याद्री पर्वतरांगा आणि हिमालयातून ट्रेकिंग करून दरवर्षी ‘कोल्हापूर हायकर्स’ शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हे पवित्र जल आणत असते. यंदाही चारही दिशांतून हे जल आणण्याची मोहीम ‘कोल्हापूर हायकर्स’नी पूर्णत्वास नेली आहे.
१ मेपासून ‘कोल्हापूर हायकर्स’ची टीम हे जल संकलित करण्यासाठी रवाना झाली होती. शिवनेरी, सिंदखेडराजा, बंगळूर फोर्ट, राजगड या ऐतिहासिक स्थळांवरून तसेच सिंधू (उत्तर भारत), कृष्णा (दक्षिण भारत), श्रीशैलम (आंध्र प्रदेश), तंजावर (तमिळनाडू) असा सात हजार किलोमीटरचा प्रवास करून जल संकलित करण्यात आले. यात समितीप्रमुख सागर पाटील, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, अमित अडसुळे, विजय ससे, इंद्रजित मोरे, नील सावंत, अविनाश भाले, सत्यजित माने, अक्षय पाटील, रोहित खाडे, श्रावणी पाटील, संघवी राजवर्धन व सचिन पाटील यांनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com