यिन समर युथ समीट नाव नोंदणी

यिन समर युथ समीट नाव नोंदणी

लोगो - 04720
...

‘समर यूथ समीट’ची नावनोंदणी अंतिम टप्प्यात

उत्सुकता शिगेला ःशुक्रवारपासून तरुणाईची ऊर्जा सळसळणार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २४ ः सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) तर्फे ‘चला, घडू देशासाठी’ या दोन दिवसीय ‘समर यूथ समीट’ बाबत विद्यार्थ्यांमध्ये सळसळता उत्साह पहायला मिळणार आहे. या शिबिरासाठीची नावनोंदणी अंतिम टप्प्यात पोचली आहे. शिबिरासाठी मुख्य प्रायोजक पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी असून सहप्रायोजक सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, रिलायन्स ॲनिमेशन ॲकॅडमी, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी, विद्या प्रबोधिनी व डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यूथ फाउंडेशन, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, फोर्ट इंटरनॅशनल स्कूल, विवेकानंद कॉलेज, वेल्टा यांचे सहकार्य असणार आहे.

या शिबिरात दरवर्षी कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर व धाराशिव येथून तरुणाईचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. यंदा ही समिट शुक्रवारी (ता. २६) व शनिवारी (ता. २७) विवेकानंद कॉलेज येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळूंखे स्मृतिभवन येथे होणार आहे. या समिटमध्ये तरुणाई आणि आध्यात्म, भावनिक आणि मानसिक स्वास्थ, सृजनात्मक विचार, सामाजिक, आर्थिक साक्षरता, स्टार्टअप, राजकीय, संतुलित जीवनशैली अशा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मार्गदर्शक, सेलिब्रेटी मार्गदर्शन करणार आहेत. विविध क्षेत्रांत उत्तुंग यश मिळवणारी अनेक धाडसी व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्‍वे यानिमित्ताने ‘यिन’च्या व्यासपीठावर येऊन तरुणाईला सकारात्मक दिशा देतात. ही सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी ‘यिन समर समिट’साठी आत्ताच नावनोंदणी करा...
...

नोंदणीसाठी संपर्क
समर यूथ समीटसाठी नाव नोंदणी करण्यासाठी ९९९ रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. यामध्ये सहभागींना वाईल्ड क्राफ्ट कंपनीची बॅग (२९९९/-) डायरी, प्रमाणपत्र, भोजन व निवास व्यवस्था, ओळखपत्र या बाबी देण्यात येणार आहेत. शिबिरात सहभागी होण्यासाठी यिन सहायक व्यवस्थापक अवधूत गायकवाड (कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी संपर्क ः ९९७५१३१२७०), अभिजित शिंदे (सोलापूर, धाराशिवसाठी संपर्क ः ९९६०७९७३०७), अजिंक्य शेवाळे (सातारासाठी संपर्क ः ९९२१२४१४५७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
------

कोट
‘अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्जनशीलतेसह मूळ कथांचा वापर करून प्रेक्षकांसाठी कल्पनारम्य आणि उत्साहाचे जग निर्माण करणे हे रिलायन्स ॲनिमेशनचे ध्येय आहे. तरुणांना करिअरचा योग्य मार्ग शोधण्यात मदत करण्यासाठी ‘सकाळ’ने ‘यिन’ व्यासपीठ बनविले.
- तेजोनिधी भंडारे, मुख्य अधिकारी, रिलायन्स ॲनिमेशन ॲकॅडमी (04669)
...

‘महाराष्ट्राच्या युवा वर्गाला एकाचवेळी असीम ऊर्जेने प्रेरित आणि कृतिशील करणारी एक मात्र म्हणता येईल अशी इव्हेंट म्हणजे ‘यिन समर समिट’. ‘यिन’ सारखे व्यासपीठ तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी यानिमित्ताने देणार, यात शंका नाही.
- राजकुमार पाटील, संचालक, विद्या प्रबोधिनी (04671)
...
‘राज्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी यिन व्यासपीठाशी जोडली गेली आहेत. सामाजिक उपक्रमांतून ते स्वत:ला घडवू पाहत आहेत. या वयात या प्रकारचे व्यासपीठ मिळणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे आहे.

- चंद्रहार पाटील, चेअरमन, डब्बल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यूथ फाउंडेशन (04674)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com