आमदार ऋतुराज पाटील यांच्या सुचना

आमदार ऋतुराज पाटील यांच्या सुचना

04753

‘दक्षिण’मधील प्रश्न तातडीने सोडवा
---
आमदार ऋतुराज पाटील; जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक
कोल्हापूर, ता. २४ : ‘दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक आणि प्रशासकीय प्रश्न, नागरिकांशी संबंधित प्रश्न प्रशासनाने तातडीने सोडवावेत,’ अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी केल्या.
दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली. या वेळी गडमुडशिंगी, दिंडनेर्ली, उजळाईवाडी, सरनोबतवाडीतील प्रश्नाबाबत चर्चा झाली. दिंडनेर्ली ते देवाळे हा रस्ता काही स्थानिक शेतकऱ्यांच्या सर्व्हे नंबरमधून जात आहे. याबाबत शेतकऱ्यांची संमतीपत्रे घेऊनच या रस्त्याचे काम करावे, अशी सूचना करण्यात आली. यावर रेखावार यांनी याबाबत वृत्तपत्रांत नोटीस प्रसिद्ध करण्याबरोबर गाव चावडीवर नोटीस प्रसिद्ध करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जलजीवन मिशनच्या कामासाठी अनेक गावांमध्ये रस्त्यांची खोदाई केली आहे. रेखावार यांनी जलजीवन मिशन कामाच्या टेंडरमध्ये रस्ते दुरुस्तीची अट नमूद केल्याचे सांगितले. ज्या टेंडरमध्ये रस्ते दुरुस्तीची अट नसेल, त्याचे नव्याने टेंडर करण्याच्या सूचना त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांना केल्या. रस्ते दुरुस्तीशिवाय संबंधित ठेकेदाराची बिले अदा करू नये, अशा सूचनाही दिल्या. विमानतळ विस्तारीकरणात ज्यांची घरे संपादित होत आहेत, त्यांना प्लॉट देण्याच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली.
निर्माण चौक येथील गट नंबर ७१४ ‘ए’ येथील ११० प्लॉटधारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा विषय प्रलंबित आहे. काही त्रुटीमुळे हे प्रकरण तहसील कार्यालयात प्रलंबित असून, ते तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. या वेळी विवेक काळे, किरण माने, महेश कांजर, नरेश पाटील, चतुरसिंह भोसले-पाटील, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com