महापालिका अधिकारी सत्कार

महापालिका अधिकारी सत्कार

04959
कोल्हापूर : बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीतर्फे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

छोटेखानी सत्काराने फुलले
पालिका अधिकाऱ्यांचे चेहरे
कोल्हापूर, ता. २५ : ज्या स्थायी समितीच्या सभागृहात कामावरून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली जायची, त्याच सभागृहात आज नागरिकांकडून कामाबद्दल सन्मान करत पाठ थोपटली गेली. या छोटेखानी सोहळ्याने अधिकाऱ्यांचे चेहरे काही क्षण आनंदाने फुलले. निमित्त होतं हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था संचलित बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीने आयोजित केलेल्या सत्काराचे.
घरफाळ्यात सवलत देऊन कर वसुलीचा उच्चांक नोंदवल्याबद्दल कृती समितीने अधिकाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. स्थायी समितीच्या सभागृहात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, सुधाकर चल्लावाड, सचिन जाधव, राम काटकर, विजय वणकुद्रे, संजय अतिग्रे, बाबा साळोखे, दत्तप्रसाद माजगावकर, राजेंद्र जगताप, तानाजी मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वालावलकर कापड दुकान ट्रस्टचे अध्यक्ष गुरुदत्त देसाई प्रमुख उपस्थित होते.
या वेळी संस्थापक अध्यक्ष किसनराव कल्याणकर म्हणाले, ‘‘ही शाहूनगरी असून येथे जे चांगले काम करतात, त्यांना डोक्यावर घेतले जाते. डॉ. बलकवडे यांनी अधिकारी व जनतेला विश्‍वासात घेऊन कठीण परिस्थितीत घरफाळ्याचे उत्पन्न वाढवले.’’ जयकुमार शिंदे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोरोनात तसेच नंतरच्या कालावधीत चांगले काम केले. पण जे चुकते ते आम्ही दाखवून देत राहू असे सांगितले. या वेळी अतिरिक्त आयुक्त देसाई, उपायुक्त आडसूळ, शहर अभियंता घाटगे, जल अभियंता सरनोबत, उपशहर रचनाकार मस्कर यांची भाषणे झाली.सचिव पद्‍माकर कापसे यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष रामेश्‍वर पत्की यांनी प्रास्ताविक केले.
----------------
कोट
उत्पन्न वाढीसाठी विभागाने गेल्या एप्रिलपासून नियोजन केले. हे सर्व श्रेय टिमचे आहे. शिस्त लावण्याच्या केलेल्या प्रयत्नांमुळे अधिकाऱ्यांना वाईट वाटत असेल. पण त्याचा भविष्यात त्यांना फायदाच होईल.
- डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com