घरकूलसाठी गुरव कुटूंबियांचे उपोषण

घरकूलसाठी गुरव कुटूंबियांचे उपोषण

gad254.jpg
04985
गडहिंग्लज : घरकूलसाठी तानाजी गुरव व कुटूंबियांनी तहसील कार्यालयासमोर गुरुवारी केलेल्या उपोषणावेळी शिवाजी गुरव यांचे भाषण झाले. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------------------------------
घरकूलसाठी गुरव कुटूंबियांचे उपोषण
गडहिंग्लजला आंदोलन : लेखी आश्‍वासनानंतर उपोषण स्थगित
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : तालुक्यातील हरळी बुद्रुक येथील रहिवाशी तानाजी गुरव यांनी आपल्या कुटूंबासह तहसील कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषणास बसले. घरकूल मंजूर व्हावे आणि तोपर्यंत प्रशासनाने राहण्याची व्यवस्था करावी या मागणीसाठी हे आंदोलन केले. दरम्यान, लेखी आश्‍वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित केले.
तानाजी गुरव, पत्नी शशिकला, मुलगी अनुजा, मधुरा व मुलगा विनायक हे पाचही जण आज सकाळपासून कोणी घर देता का घर असा फलक घेवूनच तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व शिवाजी गुरव यांनी केले. ते म्हणाले, ‘तानाजी गुरव यांच्या वाटणीला आलेले घर २०१८ च्या अतिवृष्टीत कोसळले आहे. त्यानंतर गुरव कुटुंबिय गावातच भाड्याच्या घरात राहत होते. दरम्यान, महालक्ष्मी यात्रेमुळे घरमालकांनी त्यांना घर सोडण्यास सांगितले. यामुळे गुरव कुटुंबिय पुन्हा आपल्या पडक्या घरात संसार मांडला. ऊन, वारा, पावसातही हे कुटूंब उघड्यावर राहत आहे. यामुळे प्रशासनाने त्यांची राहण्याची सोय करावी आणि घरकूल मंजूर करावे.
दरम्यान, पंचायत समितीच्या घरकूल योजनेच्या अमृता देशपांडे, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी श्रद्धा वुदावंत यांच्याशी शिवाजी गुरव, बाळेश नाईक, सुरेश वडराळे यांनी चर्चा केली. यामध्ये गुरव कुटूंबियांच्या भावकीशी ३१ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा करण्यासह गुरव कुटूंबियांना घरकूल देण्याच्या आश्‍वासनाचे लेखी पत्र सहायक गटविकास अधिकारी ए. पी. गजगेश्‍वर यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com