इचलकरंजीची नवी ओळख ‘एचएच ५१’

इचलकरंजीची नवी ओळख ‘एचएच ५१’

इचलकरंजीची नवी ओळख ‘एचएच ५१’
‘आरटीओ’ कार्यालयासाठी नोंदणी क्रमांक; गृह विभागाचे आदेश जारी
इचलकरंजी, ता.२५ ः इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यासाठी मंजूर झालेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी एमएच ५१ हा नोंदणी क्रमांक मिळाला आहे. याबाबतचा आदेश शासनाच्या गृह विभागाकडून आज जारी केला.
आमदार प्रकाश आवाडे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. या निर्णयानंतर गृह विभागाचे अवर सचिव भरत लांघी यांनी स्वतंत्र आदेश देत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास लागणाऱ्या खर्चाचा तपशील तसेच इमारत जागा व पदांची उपलब्धता यासह अनुषांगिक बाबीचा तपशील सादर करण्यास परिवहन आयुक्तांना कळवले आहे. त्यामुळे नजिकच्या काळात इचलकरंजीतून स्वतंत्र परिवहन कार्यालय सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इचलकरंजी हे वस्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असल्याने विविध उद्योगाच्या निमित्ताने वाहनांची संख्या मोठी आहे. तसेच हातकणंगले व शिरोळ तालुक्यासाठी इचलकरंजी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. पण येथील वाहनधारकांना वाहन पासिंगसाठी कोल्हापूर येथे जावे लागत असल्याने परिणामी वेळ व पैसा खर्ची पडतो. त्यामुळे शहराचा वाढता विस्तार व भौगोलिक परिस्थिती व दोन्ही तालुक्यातील वाहनांची संख्या लक्षात घेऊन इचलकरंजी येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु व्हावे म्हणून आमदार आवाडे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा सुरु ठेवला होता.
दोनच दिवसांपूर्वी आमदार आवाडे यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास शासनाने मंजूरी दिल्याचे सांगितले होते. त्यासंदर्भातील अध्यादेश आज गुरुवारी राज्याच्या गृह विभागाने जारी केला आहे. यामध्ये इचलकरंजीसाठी मंजूर झालेल्या नविन कार्यालयासाठी एमएच ५१ हा नवीन नोंदणी क्रमांक दिल्याचे आदेशात नमूद केले आहे. एक तपाहून अधिक काळ या कार्यालयासाठी पाठपुरावा सुरु होता. तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांनी या कार्यालयासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. अखेर आमदार आवाडे यांच्या पाठपुराव्यानंतर इचलकरंजीला आणखी एक स्वतंत्र ओळख निर्माण होणार आहे.
--------------
नोंदणी क्रमांकाबाबत गोंधळ
इचलकरंजी कार्यालयासाठी एमएच ५१ हा नोंदणी क्रमांक मंजूर झाला आहे. तथापि, समाज माध्यमातून हा नोंदणी क्रमांक नाशिक ग्रामिणचा असल्याचा संदेश फिरत होता. मात्र परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाची पाहणी केली असता त्यामध्ये एमएच ५० हा कराडचा शेवटचा नोंदणी क्रमांक आहे. त्यानंतर नविन नोंदणी झाली नसल्याचे दिसून आले. त्यानंतर याबाबत निर्माण झालेला गोंधळ दूर झाला.
------------
समर्थकांमध्ये श्रेयवादाचे वादळ
आरटीओ कार्यालय मंजुरीचा विषय प्रलंबित होता. अखेर हा विषय मार्गी लागला. आमदार आवाडे यांनी या शासन कालावधीत पाठपुरावा केला. त्याला यश आले. आज याबाबतचा आदेश जारी झाल्यानंतर माजी आमदार हाळवणकर समर्थक समाज माध्यमात अॅक्टीव्ह झाले. याबाबतचा निर्णय हाळवणकर यांच्या कार्यकाळात शासनाने निर्णय घेतल्याचा दावा केला. त्यामुळे आजी - माजी आमदारांमध्ये समाज माध्यमातून जोरदार श्रेयवाद उफाळला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com