गुरूपुष्यामृत

गुरूपुष्यामृत

04958
कोल्हापूर : गुरूपुष्पामृत निमित्ताने व्हीनस कॉर्नस परीसरातील सराफ दुकानात सोने खरेदीसाठी झालेली गर्दी. (नितीन जाधवः सकाळ छायाचित्रसेवा)

सोन्याला झळाळी गुरूपुष्यामृताची!
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : गुरूपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर गुजरीत ग्राहकांकडून सोन्याच्या खरेदीला चांगला प्रतिसाद लाभला. सकाळपासूनच खरेदीचा मुहुर्त असल्याने महिलावर्गाची दागिन्यांच्या शोरूममध्ये गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. आज २४ कॅरेट सोन्याचा दर ६१ हजार ७०० च्या आसपास राहिला. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ५६ हजार ५०० रूपयांपर्यंत राहिला.
साडेतीन मुहूर्तापैकी दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया या सणांबरोबरच गुरूपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर अनेकजण सोने खरेदी करतात. गुरुवारीही गुजरीतील सराफी दुकानांमध्ये सोने खरेदीसाठी गर्दी पहायला मिळाली. सकाळपासून गुजरीसह लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, राजारामपुरी येथील शोरुम्स ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज होत्या. गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त सकाळपासूनच असल्याची दिवसभर ग्राहकांची लगबग राहिली. एक ग्रॅम सोन्याचे वळे, कॉइन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल होता. अनेक शोरुम, दुकानांत मोठी गर्दी झाली. नवीन फॅशनचे एक ग्रॅमचे दागिने खरेदीकडे महिलांचा कल होता.
बहुतांशी ग्राहकांनी बदलेल्या ट्रेंडनुसार दागिने खरेदी केल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. मार्चमध्ये गुढीपाडवा आणि एप्रिल महिन्यात अक्षय्य तृतीया आणि आजच्या गुरू पुष्यामृत मुहूर्तावर सलग तीन महिने ग्राहकांकडून चांगली सोने खरेदी झाल्याचे सराफांनी सांगितले. सध्या लग्नसराई सुरू असल्याने अनेकांनी आजचा मुहूर्त साधून दागिने घडविण्यासाठी सोने खरेदी केली. सलग तीन गुरूपुष्यामृत आणि गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया अशा सलग मुहुर्तांमुळे आजच्या मुहुर्तावरही याचा परिणाम झाला, अशाही प्रतिक्रिया काही सराफ व्यावसायिकांनी दिल्या.
---------
कोट
गुरूपुष्यामृत मुहुर्तावर पारंपरिक सोन्याचे दागिने तसेच हिऱ्यांच्या दागिन्यांना मोठी मागणी राहिली. सकाळपासूनच सोन्याच्या खरेदीसाठी शोरूममध्ये महिला वर्गाने गर्दी केली.
- प्रसाद कामत, तनिष्क ज्वेलर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com