आवश्यक- संक्षिप्त

आवश्यक- संक्षिप्त

५०७२

चिल्लर पार्टीतर्फे उद्या
''जॅक द जायंट सेलर'' चित्रपट

कोल्हापूर ः येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे रविवारी (ता. २८) ‘जॅक द जायंट सेलर'' हा चित्रपट दाखवला जाणार आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनात सकाळी दहा वाजता शालेय विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखवला जाईल. जॅक हा एका शेतकऱ्याचा मुलगा असून, एका पावसाळी रात्री राजकन्या इझाबेल जॅकच्या घरात आसरा घेते आणि पुढे राजकन्या राक्षसांच्या तावडीत सापडते, अशा मध्यवर्ती कथेवर हा चित्रपट बेतला आहे. चित्रपटाचा शालेय विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
............
05074
शिंदे ॲकॅडमीतर्फे बालनाट्य शिबिर
कोल्हापूर : येथील शिंदे ॲकॅडमीतर्फे झालेल्या बालनाट्य शिबिरांतर्गत मुलांचा नाट्याविष्कार नुकताच येथील केशवराव भोसले नाट्यगृहात सजला. पन्नास ते साठ वर्षांपूर्वी लिहिलेली बालगीते, बडबडगीते शोधून त्याचे लयबद्ध सादरीकरण करण्यात आले. या कवितांमध्ये बालकवी लिखित ‘औदुंबर'', वसंत बापट लिखित ‘बाबू झाड'', मधुसूदन कालेलकर लिखित ‘आई कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी’ ही सादरीकरणे झाली. तांडव स्त्रोतासह ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातील उताऱ्याचे सादरीकरण झाले. ‘रंग साहित्याचे’ या बालनाट्यात आजच्या मोबाईलवरील खेळांच्या दुःष्‍परिणामावर भाष्य झाले.
सुनील शिंदे, ललिता शिंदे, संदीप शिंदे, प्रथमेश मानेकरी, श्रेया दुधगावकर यांचे मार्गदर्शन होते तर ऋषिकेश गुडघे आणि आदित्य राजे सूर्यवंशी यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. सुचिता सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
..............
‘तेजज्ञान''तर्फे उद्या हॅप्पीनेस फॅमिली शिबिर
कोल्हापूर ः पुण्यातील तेजज्ञान फाउंडेशनच्या वतीने रविवारी (ता. २८) परिवारातील नातेसंबंध आणखी दृढ व्हावेत, या उद्देशाने निःशुल्क फॅमिली शिबिराचे आयोजन केले आहे. कुटुंबातील सोळा वर्षांवरील सर्वांना या शिबिराचा लाभ घेता येणार आहे. सकाळी दहा ते दुपारी साडेचार या वेळेत फाउंडेशनच्या वाय. पी. पोवार नगरातील सभागृहात तर कागलमधील श्रीराम मंदिर हॉलमध्ये ही शिबिरे होणार आहेत. इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनने केले आहे.
............
संस्कार विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश सुरू
कोल्हापूर ः येथील शिल्पकार शिक्षण संस्था संचालित शाहू मिल कॉलनीतील संस्कार विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश सुरू झाले आहेत. जातनिहाय गुणवत्तेनुसार मागासवर्गीय, भटक्या जाती-जमाती, ओबीसी, आर्थिक मागास आणि दिव्यांग पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी वसतिगृह व्यवस्थापक ऋषभ सांगावकर यांच्याशी संपर्क साधावा.
.......
हिंदू एकता दिंडी सोमवारी
कोल्हापूर ः येथील सनातन संस्थेच्या वतीने संस्थापक डॉ. जयंत आठवले यांच्या जयंतीनिमित्त शहरातून हिंदू एकता दिंडी निघणार आहे. मिरजकर तिकटी येथून सायंकाळी पाचला या दिंडीला प्रारंभ होईल. खरी कॉर्नर, महाव्दार रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरून दिंडी निघणार असून, सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. मानसिंग शिंदे यांनी केले.
.............
चर्मकार महासंघातर्फे उद्या मेळावा
कोल्हापूर ः येथील राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. २८) चर्मकार महासंघाचा मेळावा होणार आहे. सुभाषनगरातील संत रोहिदास महाराज मंदिरात सायंकाळी साडेचारला हा मेळावा होणार असून, समाजाच्या विविध मागण्यांवर मंथन होणार आहे. सर्व समाजबांधवांनी मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन महासंघाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com