सीपीआर पहारेकऱ्यांवर चाकू हल्ला

सीपीआर पहारेकऱ्यांवर चाकू हल्ला

फोटो
...

सीपीआरच्या सुरक्षा रक्षकावर चाकू हल्ला


कोल्हापूर, ता. २६ ः सीपीआर रुग्णालयामध्ये प्रवेश करताना सुरक्षा रक्षकाने विचारणा केल्याच्या रागातून तरुणाने त्याच्यावर चाकू हल्ला केला. यामध्ये पवन संजय कदम (वय २६, रा.इस्लामपूर, ता.वाळवा. जि.सांगली) हा महाराष्ट्र सुरक्षा बलाचा कर्मचारी जखमी झाला. त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार झाले. हल्ला करणारा तरुण सीपीआरमधील कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. गुन्हा नोंद करण्याचे काम लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सीपीआर पोलिस चौकी आणि कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीपीआरमध्ये सकाळी ओपीडी सुरू असते. त्यामुळे नऊ ते दुपारी बाराच्या सुमारास रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना प्रवेशद्वारावर विचारणा करून सोडले जाते. याचेवळी एक तरुण दुचाकीवरून तेथे आला. त्याला सुरक्षारक्षक पवन कदम यांनी रोखले. यावर ‘मी कोण आहे माहिती नाही काय?, ’ असे म्हणून त्याने कदम यांना ‘तुला सोडत नाही, ठार करतो’ अशी धमकी दिली. त्यानंतरही कदम यांनी त्याला पार्किंगमध्येच दुचाकी लावण्यासाठी सांगितले. तरुणाने दुचाकी पार्किंगमध्ये लावल्यानंतर तेथून तो निघून गेला. थोड्याच वेळाने तो घरातून चाकू घेवून पुन्हा प्रवेशद्वाराजवळ आला आणि कदम यांच्यावर चाकूने हल्ला केला. कदम यांनी तो चुकविला. यामध्ये त्यांच्या हाताला आणि कंबरेला जखम झाली. इतर कर्मचाऱ्यांनी या तरुणाला अडविण्याचा आणि पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो तेथून पळून गेला. यानंतर कदम यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com