बिग स्टोरी

बिग स्टोरी

प्रसिध्दी- मंगळवार, ३० मे
..........
05566, 05568

लोगो
बिग स्टोरी
-
उदयसिंग पाटील

आरोग्य रक्षकांची साधनांविनाच ‘लढाई’
-
महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याचे स्वास्थ्य जपण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज

सफाई करताना उडणारी धूळ, तुंबलेले ओढे-चॅनेलमधील काळे सांडपाणी, सडलेल्या कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी अशा स्थितीत कुणालाही नाक-तोंड-डोळे बंद करावे असेच वाटते. मात्र, महापालिकेचे सफाई कर्मचारी दररोज हेच काम ग्लोव्हज, गमबूट, मास्क, जॅकेट अशी कोणतीही सुरक्षेची साधने न वापरता करत आहेत. महापालिकेने त्यांना ही साधने उपलब्ध केली असूनही त्याचा वापर जवळपास कुणीच करत नाही अशी स्थिती आहे. त्यादिवशी त्यांना त्रास वाटत नाही; पण महापालिकेनेच मध्यंतरी केलेल्या आरोग्य तपासणीत आजाराचे प्रमाण असणाऱ्यांची संख्या लक्षणीय दिसली. जे शहराचे आरोग्य राखण्यासाठी रस्त्यावर काम करत असतात, त्यांनी स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

... तर श्‍वसनाच्या विकारांपासून दूर
दररोज पहाटेपासून शहरातील रस्त्यांवर दिसत असतात ते महापालिकेच्या आरोग्य विभागातील झाडू कामगार व सफाई कामगार. सकाळी सहा ते दुपारी दोन व दुपारी दोन ते रात्री दहा अशा महत्त्वाच्या दोन शिफ्टबरोबरच काहीजण रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत काम करतात. झाडू कामगार नेमून दिलेल्या भागातील रस्ते स्वच्छ करण्याचे काम करतात तर सफाई कर्मचारी गटारी, नाले, ओढे यांची स्वच्छता करतात. त्याशिवाय ड्रेनेज विभागाचे कर्मचारी तुंबलेली ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्याचे काम करतात. झाडू व सफाई कामगारांसाठी खोरे, पाटी व खराटा ही साधने असतात. त्यांना सफाई करताना त्रास होऊ नये म्हणून मास्क, कचरा उठाव करण्यासाठी ग्लोव्हज तसेच नाल्‍यातील सफाई व गटार साफ करताना गमबूट दिले जातात. मास्क वापरताना कुणी दिसत नाही. मात्र, महिला कर्मचारी स्कार्फ तर पुरुष कर्मचारी रूमाल तोंडाला बांधतात. मास्क वापरले तर निश्‍चितच उतरत्या वयात जाणवणारे श्‍वसनाचे विकार कमी होऊ शकतात.

नाल्यात उतरतात विनागमबूटच
कर्मचारी गमबूट वापरत नाहीत. नाले, गटारीत उतरताना अनवाणी असतात. रस्त्यावरील कचऱ्याच्या ढिगातही स्लीपर, चप्पल, सॅंडल घालून सफाई करतात. रस्त्यावर झाडू मारणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रिफ्लेक्टर असलेली जॅकेट दिली आहेत. त्या जॅकेटमुळे वाहनधारकांना ते दिसून येतात. जीवासाठी महत्त्वाची असलेली ही जॅकेटही कर्मचारी घालत नाहीत. प्रशासनाकडून किट दिले जाते. मात्र, त्याच्या वापरासाठी कुणी सक्ती करत नाही. परिणामी, कर्मचाऱ्यांकडून मागणी होत नसल्याने प्रशासनाकडूनही ही साधने वारंवार दिली जात नसल्याची स्थिती आहे. गटार तुंबल्यानंतर सळी घालावी लागते. ती सळी गटारीत घालून आत बाहेर करावी लागते. त्या सळीला लागलेली काळी घाण हाताला लागते. त्यासाठी ग्लोव्हज घातले जात नाहीत. ती घाण पाण्याने वरवर स्वच्छ होत असली तरी त्याचे काही प्रमाण नखात अडकून राहतेच. त्यातून आरोग्याला धोका होऊ शकतो.

मुकादमांचे हवे लक्ष
सफाई कर्मचाऱ्यांना नाल्यात उतरावे लागते, गटारी साफ कराव्या लागतात. त्यांची संख्या २५० आहे. त्या सर्वांना मास्क, ग्लोव्हज, गमबूटचे किट दिले जाते. त्याचबरोबर झाडू कामगारांना मास्क व ग्लोव्हज दिले पाहिजे. याशिवाय त्यांना ही साधने वापरण्यास सांगण्याचे काम मुकादमावर सोपवावे. जे कर्मचारी वापरणार नाहीत, त्यांची जबाबदारी मुकादमावर टाकल्याशिवाय साधने वापरली जाणार नाहीत.
.................
चार्ट करणे
शहरातील चित्र
झाडू कर्मचारी - १५६५
सफाई कर्मचारी - २५०
आरोग्याचे वॉर्ड - १३
............
ठळक चौकट
सफाईची ठिकाणे
प्रभागांमधील भाग, नाले-गटारी, ड्रेनेज लाईन, स्मशानभूमी, भाजी मंडई, मटण मार्केट.
..................
ठळक चौकट
दिली जाणारी साधने
खोरे, पाटी, खराटा, गमबूट, रिफ्लेक्टर जॅकेट, ग्लोव्हज, मास्क.
..............
कोट
सफाई व ड्रेनेज कर्मचाऱ्यांना गमबूट, चष्मा, मास्क, ग्लोव्हजचे किट दिले जाते. त्यांच्याकडून वापर होत नाही. तसेच झाडू कामगारांना मास्क व ग्लोव्हज देण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर आहे. त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांनी मागणी केल्यास त्यांना ते साहित्य उपलब्ध करून द्यायला हवे. मात्र, बहुतांश कर्मचारी मागणी करत नाहीत. कर्मचाऱ्यांना साहित्य वापराबद्दल व त्याच्या परिणामांबद्दल प्रशिक्षण दिले आहे.
- डॉ. विजय पाटील, सहाय्यक आयुक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com