Sat, Sept 30, 2023

आजरा ः पोलीस वृत्त
आजरा ः पोलीस वृत्त
Published on : 28 May 2023, 3:31 am
व्हेल उलटी प्रकरणातील
पाच जणांना पोलिस कोठडी
आजरा ः व्हेल माशाच्या उलटीप्रकरणी आजरा पोलिसांनी शनिवारी (ता. २७) कुडाळ येथील पाच जणांना अटक केली होती. ही कारवाई
आजरा पोलिस व वनविभाग अशा संयुक्त पथकाने केली होती. अकबर याकूब शेख (वय ५१, रा. पिंगोली, मुस्लमवाडी, ता कुडाळ), शिवम किरण शिंदे (वय २३, रा. अभिनव नगर नं. २ कुडाळ जि. सिंधुदुर्ग), गौरव गिरीधर केरवडेकर (वय ३३, रा. केरवडे तर्फ माणगाव, ता. कुडाळ), इरफान इसाक माणियार (वय ३६, रा. पोष्ट ऑफीस गणेश नगर, कुडाळ), फिरोज भाऊद्दीन ख्वाजा (वय ५३, रा. कोलगाव, ता. सावंतवाडी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना चंदगड येथील न्यायालयासमोर उभे केले असता या पाचही जणांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.