मुख्यमंत्री दौरा

मुख्यमंत्री दौरा

फोटो
...
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रविवारी कोल्हापुरात

शासन आपल्या दारी :

कोल्हापूर, ता. ३० : राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा, यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबवले जात आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (ता.४) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.
‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली हे अभियान राबवले जाणार आहे. त्यानुसार आपल्या विभागाअंतर्गत असलेल्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळवून द्यावा’, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात शासन आपल्या दारी अभियान पूर्वतयारी अंतर्गत आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कांबळे म्हणाले, ‘शासन आपल्या दारी या योजनेनुसार गावागावात जाऊन आपल्या विभागाच्यावतीने सर्वेक्षण केले आहे. पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या याद्या तयार केलेल्या आहेत. संबंधित लाभार्थ्याला शंभर टक्के लाभ मिळाला पाहिजे. शासन आपल्या दारी या अभियानामध्ये मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना लाभ देतील.’
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, करवीर तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्यासह अन्य विभागांचे विभागप्रमुख तथा प्रतिनिधी उपस्थित होते.
....

९५ हजार लाभार्थ्यांना लाभ

''शासन आपल्या दारी'' उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. तरीही जिल्हा प्रशासन ९५ हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ देणार आहे. प्रत्येक गावात व प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन शासकीय योजनेच्या लाभास पात्र व्यक्तींचे सर्वेक्षण केलेले आहे. तालुकानिहाय लाभार्थी निवडीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यामध्ये करवीर तालुक्यात १० हजार, गगनबावडा ४ हजार, शिरोळ १० हजार, हातकणंगले १० हजार, पन्हाळा ८ हजार, शाहूवाडी ८ हजार, कागल ८ हजार, राधानगरी ८ हजार, आजारा ८ हजार, भुदरगड ७ हजार, चंदगड ७ हजार व गडहिंग्लज ७ हजार याप्रमाणे तालुकानिहाय लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com