आजरा ः तालुका संघ पदाधिकारी निवड बातमी

आजरा ः तालुका संघ पदाधिकारी निवड बातमी

आजरा तालुका संघ पदाधिकाऱ्यांची आज निवड

आजरा ः आजरा तालुका शेतकरी सहकारी संघाची पदाधिकारी निवड बुधवारी (ता.३१) होत आहे. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी गडहिंग्लज तालुक्याचे सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमित गराडे आहेत. आजरा तालुका शेतकरी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सत्ताधारी श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीने सर्वच जागा जिंकत एकहाती विजय मिळवला. त्यामुळे पुन्हा तालुका संघावर राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे वर्चस्व सिध्द झाले आहे. या संघाची पदाधिकारी निवड आज होत आहे. सत्ताधारी श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीच्या सर्व सदस्यांची निवडसभेपूर्वी सकाळी आठ वाजता पदाधिकारी निवडीसाठी बैठक होणार आहे. या बैठकीला नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब होईल. दरम्यान, ज्य़ेष्ठ सदस्य विठ्ठलराव देसाई यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत असून त्यांची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. निवडीकडे तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com