
माजी विद्यार्थ्यांकडून पाणी शुद्धीकरण यंत्रणा
gad305.jpg
05919
हलकर्णी : हलकर्णी भाग हायस्कूलमधील माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यानिमित्त ३६ वर्षांनी एकत्र आले होते.
--------------------------------------------------
माजी विद्यार्थ्यांकडून
पाणी शुद्धीकरण यंत्रणा
नूल, ता. ३० : तालुक्यातील हलकर्णी भाग हायस्कूलमधील १९८६-८७ या शैक्षणिक वर्षातील दहावी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहमेळावा झाला. अध्यक्षस्थानी एस. एस. पाटील होते.
माजी शिक्षक व्ही. टी. जोलापुरे, के. आर. शेडगे, ए. डी. देसाई, एस. एम. रामाजगोळ, एस. एस. पाटील, के. बी. चौगले, ए. एम. चौगुले, एम. आर. संकपाळ, एस. एस. आसवले. व्ही. एन. गरुड, इब्राहीम मकानदार, अशोक चिकबसर्गे, मुख्याध्यापक आर. एस. पाटील आदींचा सत्कार झाला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या व शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या बॅचचे विद्यार्थी व सध्या पुणे येथील उद्योजक उदय चौगुले, शिक्षक आनंद व्हसकोटी, इस्माईल कादरभाई, शिवशंकर हत्तरकी, बाळासाहेब रत्नापगोळ, महादेव पाथरवट, दस्तगीर मकानदार, हेमा धबाले, कल्पना निर्वाणी यांची भाषणे झाली.
विद्यार्थ्यांनी शाळेसाठी दीड लाख रुपये किमतीची पाणी शुद्धीकरण यंत्रणा भेट दिली. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय शहा व मुख्याध्यापक पाटील यांनी आभार मानले. शिवशंकर हत्तरकी व उदय चौगुले यांनी अध्यक्ष व शिक्षकाशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. सपना भेंडीगिरी यांनी सूत्रसंचालन केले. राजकुमार हिरेमठ यांनी आभार मानले.