माजी मंत्री दिवाकर रावते बातमी

माजी मंत्री दिवाकर रावते बातमी

05903
...

महिलांनी स्वसंरक्षणासाठी सिद्ध असावे

माजी मंत्री दिवाकर रावते यांचे प्रतिपादन

कोल्हापूर, ता.३० ः ‘देशात पराक्रमी महिला होऊन गेल्याची इतिहासात नोंद आहे. आजही सैन्य, पोलिस यामध्ये महिला सक्षमपणे कार्यरत आहेत. महिलांनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेऊन सिद्ध असले पाहीजे,’ असे प्रतिपादन माजी मंत्री दिवाकर रावते यांनी केले. राजारामपुरी येथे शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण वर्गाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.
राजारामपुरी येथील महापालिकेच्या ९ नंबर शाळेच्या पटांगणावर शिवकालीन युद्धकलेचा प्रशिक्षण वर्ग झाला. प्रज्ञा उत्तुरे आणि महेश उत्तुरे यांनी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. यामध्ये तरुण, तरुणी, मुले यांनी स्वरंक्षणाचे धडे गिरवले. वर्गाचा सांगता समारंभ आज झाला. यावेळी प्रशस्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला माजी मंत्री दिवाकर रावते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रावते म्हणाले, ‘अनेक पराक्रमी स्त्रिया देशात होऊन गेल्या. त्यांच्या शौर्याच्या कथा आपण इतिहासात वाचतो. आजही पोलिस दलात आणि सैन्यात महिला सक्षमपणे काम करत आहेत. यापासून प्रेरणा घेऊन महिलांनी आत्मसंरक्षणासाठी सिद्ध झाले पाहीजे. या दृष्टीकोनातून असे प्रशिक्षण वर्ग उपयुक्त ठरतात. अशा वर्गांचे आयोजन सातत्याने केले गेले पाहीजे. तसेच त्यामध्ये तरुण, तरुणींनी सहभागी झाले पाहीजे.’ खासदार विनायक राऊत म्हणाले, ‘महिलांनी स्वसंरक्षणासाठी नेहमी तयार असले पाहीजे. यासाठी असे प्रशिक्षण वर्ग सर्वत्र घेतले गेले पाहीजेत. पण समाजानेही आपली जबाबदारी ओळखली पाहीजे. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एका तरुणीला सर्वांसमोर मारले गेले. त्यावेळी कोणीच तिचा बचाव केला नाही. समाजानेही आपली जबाबादारी ओळखली पाहीजे.’
यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे, रविकिरण इंगवले, विभाग महिला संघटक स्वरुपा खुरंदळे, स्मिता मांडरे, शुभांगी साळोखे यांच्यासह पालक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
----------

थेट नगरसेवक, थेट संपर्क

यावेळी ‘थेट नगरसेवक, थेट संपर्क’ या ॲपचे अनावरण करण्यात आले. या ॲपमुळे क्युआरकोडद्वारे नागरिकांना आपल्या भागातील समस्या नगरसेवकांपर्यंत पोहचवता येतील. यामुळे नागरिक, प्रशासन आणि नगरसेवक यांच्यात संवाद करणे सोपे होईल, असे महेश उत्तुरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com