घोसरवाड येथे पाणी सोडण्यास मनपाने पुढाकार घ्यावा ः विठ्ठल चोपडे

घोसरवाड येथे पाणी सोडण्यास मनपाने पुढाकार घ्यावा ः विठ्ठल चोपडे

घोसरवाड येथे पाणी सोडण्यास
मनपाने पुढाकार घ्यावा ः विठ्ठल चोपडे
इचलकरंजी, ता. ३१ : शिरोळ तालुक्यातील घोसरवाड, दत्तवाड, टाकळी, टाकळीवाडी, दानवाड या गावांचा उन्हाळ्यात पाणी प्रश्न तीव्र बनतो. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दूधगंगा डावा कालव्यामधून साधारणतः तीन किमीच्या बंद पाईपमधून घोसरवाड येथील दूधगंगा नदीमध्ये पाणी सोडल्यास या गावांना उन्हाळ्यात अखंडित पाणी उपलब्ध होऊ शकेल. यासाठी इचलकरंजी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी माजी पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
या संदर्भातील महापालिकेने जलसंपदा विभागाकडे तसा प्रस्ताव सादर करावा अथवा महापालिकेच्या निधीतून हे काम हाती घ्यावे. प्रस्तावाला शिरोळ तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेतेमंडळींनाचा पाठिंबा मिळण्यासाठी इचलकरंजीतील सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. इचलकरंजी शहराच्या नियोजीत दुधगंगा योजनेला पाणी टंचाईच्या प्रश्नावरुन या परिसरातील नागरिकांचा विरोध होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावाला महत्व येणार आहे.
ते म्हणाले, ‘सध्या दूधगंगा डावा कालव्याचे काम गतीने सुरू आहे. पुढील सहा महिन्यात ते पूर्णत्वास येऊ शकते. घोसरवाडनजीक या कालव्यामधून पुढील पाच गावांसाठी लागणारे पाणी बंद पाईपलाईनमधून घोसरवाड येथील दुधगंगा नदीत सोडल्यास पुढील साधारणतः नऊ किमीमधील सर्व गावांना नदीमधून नियमित पाणीपुरवठा होणार आहे. तसेच हे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात येणार असल्याने दूधगंगा नदीमधून जादाचे पाणी सोडण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच या योजनेसाठी येणारा खर्चही अत्यंत कमी असून भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याच्या संकटातून या गावांची कायमची मुक्तता होणार आहे.’
----------
जलसंपदा विभाग सकारात्मक
या प्रस्तावाबाबत पाणीपुरवठा व जलसंपदा विभागाकडील तज्ज्ञांसोबत चर्चा केली आहे. त्यांनी हा अत्यंत योग्य व कमी खर्चाचा पर्याय असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या पर्यायातून या पाच गावांचा पाणी प्रश्न याद्वारे कायमचा निकाली निघू शकतो, असे मत त्यांनी वर्तवले असल्याचे चोपडे यांनी यांनी सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com