हुतात्मा उद्यान बातमी

हुतात्मा उद्यान बातमी

06077
कोल्हापूर : हुतात्मा उद्यानातील प्रस्तावित ॲम्पी थिएटर.
06078
कोल्हापूर : हुतात्मा उद्यानातील प्रस्तावित स्मारक.

हुतात्मा उद्यानाला येणार
नवी झळाळी
काम सुरू; वॉकिंग ट्रॅकसह ॲम्पी थिएटरची सुविधा
ओंकार धर्माधिकारी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ : गोखले महाविद्यालयाच्या पिछाडीस असणाऱ्या हुतात्मा उद्यानाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे. ॲम्पी थिएटर, वॉकींग ट्रॅक, लहान मुलांसाठी किड्स पार्क अशा विविध सुविधा उद्यानात बनवण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील स्वातंत्र्य सैनिकांची नावे असणारे स्मृतीस्तंबही नुकनीकरणात प्रस्तावीत आहेत. नुतनीतरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले असून नुतनीकरणावर एकूण सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
शहरामध्ये महापालिकेच्या अखत्यारीत सुमारे ५४ उद्याने आहेत. या उद्यानांचे शुशोभिकरण, विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे ही कामे महापालिकेकडून होत असतात. सध्या हुतात्मा उद्यानाचे नुतनीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. काही टप्प्यात हे काम होणार असून पहिल्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एकही झाड न तोडता नुतनीकरण केले जाणार आहे. दिव्यांगासाठी रँम्प, खुले सभागृहदेखील यामध्ये आहे. येथील स्मारकामध्ये १२ तालुक्यांचे १२ स्तंभ असणार आहेत. प्रत्येक स्तंभावर त्या तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाची नोंद असणार आहे. स्वातंत्र्याच्या हिरकमोत्सवी वर्षात हे काम होत आहे. उद्यानामध्ये फुलपाखरांची बाग विकसीत करण्याचे नियोजन आहे. यासाठी फुलपाखरांना आकर्षित करतील अशा वनस्पती येथे लावण्यात येतील. पश्‍चिम घाटात आढळणाऱ्या फुलफाखरांच्या जमाती येथे येतील.
--------------------
या असणार सुविधा
- ओपन ॲम्पी थिएटर
- अडीच किलोमीटरचा चालण्याचा मार्ग
- दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प
- स्वातंत्र्य सैनिकांची माहिती सांगणारे स्तंभ
- फुलपाखरांचे उद्यान बनवण्यासाठी विशिष्ट वनस्पतींची लागवड
- आकर्षक विद्युत रोषणाई
- नवीन वृक्षांची लागवड करणे
-------------------
हुतात्मा उद्यान नुतनिकरणाचे काम गतीने सुरू आहे. जागेचा चांगला उपयोग. उद्यानातील वृक्षांचे संवर्धन आणि इथे येणाऱ्या नागरिकांना अधिकाधिक सुविधा देणे हा नुतनीकरणाचा उद्देश आहे.
- सुरेश पाटील (सहाय्यक अभियंता)
--------------------
पूर्वीची देवराई आत्ताचे उद्यान
हुतात्मा उद्यानाची जागा ही बेटासारखी आहे. दोन्ही बाजूंना गोमती आणि जयंती या नद्या आहेत. दोन्ही नद्यांचा संगम येथे होत असून तेथे कृष्णाचे मंदीर आहे. पूर्वी उद्यानाच्या जागी देवराई होती. सटवाई देवीचे मंदिरही येथे आहे. १९७२ साली द्वारकानाथ कपूर यांच्या हस्ते हुतात्मा उद्यानाचे उद्‍घाटन झाले. या उद्यानात अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com