‘ओंकार’च्या विद्यार्थ्यांची अभ्यास भेट

‘ओंकार’च्या विद्यार्थ्यांची अभ्यास भेट

gad316.jpg
06153
नेसरी : ओंकार महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारकाला भेट देऊन माहिती घेतली.
--------------------------------------------------
‘ओंकार’च्या विद्यार्थ्यांची अभ्यास भेट
गडहिंग्लज : ओंकार कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इतिहास विभागातर्फे ऐतिहासिक स्थळांना अभ्यास भेट दिली. ऐतिहासिक पर्यटन हा करिअर ओरिएंटेड कोर्स सुरू आहे. त्यांनी या अभ्यासक्रमांतर्गत स्थानिक ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. सरसेनापती प्रतापराव गुर्जर, माजी आमदार कै. तुकाराम कोलेकर यांचे समाधीस्थळ, नेसरीकर शिंदे यांचा जुना व ऐतिहासिक वाडा, किल्ले सामानगड, भडगावमधील श्री गुड्डाईचा डोंगर आदी स्थळांना भेट देऊन माहिती घेतली. इतिहास संशोधक डॉ. सुरेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर, नेसरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी भांबर यांचे प्रोत्साहन मिळाले. डॉ. सुरेश चव्हाण, डॉ. मनोहर कोळसेकर, प्रा. संगीता लोखंडे, प्रा. प्रशांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाने या अभ्यास भेटीचे नियोजन करण्यात आले.
-----------------------------------------------
gad317.jpg
06157
गडहिंग्लज : प्राचार्यपदी निवडीबद्दल रफिक पटेल यांचा सत्कार जे. बी. बारदेस्कर यांनी केला. यावेळी अरविंद बारदेस्कर, जी. एस. शिंदे, एम. डी. पाटील उपस्थित होते.

प्राचार्यपदी निवडीबद्दल पटेल यांचा सत्कार
गडहिंग्लज : साधना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल रफिक पटेल यांचा सत्कार संस्थापक सचिव जे. बी. बारदेस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. मावळते प्राचार्य जी. एस. शिंदे यांनी त्यांच्याकडे पदभार सोपवला. अरविंद बारदेस्कर यांची पर्यवेक्षकपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. या नियुक्तीसाठी संस्थाध्यक्ष श्रीपतराव शिंदे, सचिव जे. बी. बारदेस्कर, उपाध्यक्ष चंदू गुजर, संचालक पी. पी. बारदेस्कर, अरविंद बारदेस्कर, संचालिका फिलॉन बारदेस्कर यांचे सहकार्य मिळाले. सत्कार कार्यक्रमास सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कोळकी, डॉ. एम. एस. बेळगुद्री, डॉ. किरण खोराटे, सुनील गुरव, माजी प्राचार्य एम. डी. पाटील, मुख्याध्यापक संघाचे संचालक संजय भांदुगरे उपस्थित होते.
--------------------------------------------
शौचालयासाठी पालिकेतर्फे अनुदान
गडहिंग्लज : येथील नगरपरिषदेतर्फे वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १२ हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. शौचालय नसणाऱ्‍या कुटुंबांनी पालिकेतील शहर सफाई विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी केले आहे. शौचालयासाठी स्वमालकीची जागा आवश्यक आहे. यासाठी ५ जूनअखेर नाव नोंदणी करावी, असेही प्रसिद्धी पत्रकातून खारगे यांनी कळवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com