हिंगणमिठ्ठा पुस्तक प्रकाशन

हिंगणमिठ्ठा पुस्तक प्रकाशन

06190
...

‘हिंगणमिठ्ठा’ म्हणजे आनंदाची फिलॉसॉपी

आमदार सतेज पाटील ः उत्तम फराकटे लिखित ‘हिंगणमिठ्ठा’ पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर, ता. ३१ ः ‘हिंगणमिठ्ठा’ हे पुस्तक म्हणजे निखळ आनंदाची फिलॉसॉपी आहे. पुस्तकातील प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनाशी निगडीत आहे. कोविडसारख्या संकटात नकारात्मकता भरलेली असताना असे हलकेफुलके सकारात्मकता पेरणारे पुस्तक उत्तम फराकटे यांनी लिहिले, हे मोठे यश म्हणावे लागेल,’ असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृहात उत्तम फराकटे लिखित ‘हिंगणमिठ्ठा’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते. प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. शिंदे म्हणाले,‘बालपणाच्या गोष्टी हिंगणमिठ्ठातून मांडताना त्यांनी गतस्मृतीचे चित्रण केले. त्यांनी भुतकाळाचा आरसा पुस्तकरूपातून सर्वांसमोर आणला आहे. सर्वांच्याच आयुष्यातील बालपण निखळले आहे. हे पुस्तकरूपातून श्री. फराकटे यांनी उत्तमरित्या मांडले आहे. समाज, संस्कृती, इतिहास आणि कोल्हापूरची परंपरा पुस्तकातून समोर येते.’
मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. संतोष प्रभू यांनी निखळ बालपणातील काही सुखे ही अज्ञानातून मिळत असल्याचे स्पष्ट केले. माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी ‘हिंगणमिठ्ठा’ हे पुस्तक ललितगद्य स्वरूपातील असून साहित्य क्षेत्रात महत्वाचे असल्याचे सांगितले. प्रा. दिनेश डांगे यांनी बालपणातील स्मृतींचा काढा ‘हिंगणमिठ्ठा’तून चाखायला मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी जी. पी. माळी, महादेवराव आडगुळे, बाळ पाटणकर, संजय शेटे, विवेक घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ. प्रिया दंडगे यांनी केले. आभार भाग्यश्री प्रकाशनच्या भाग्यश्री पाटील यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com