आजऱ्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावा

आजऱ्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावा

ajr11.jpg...
06249
आजरा ः आमदार प्रकाश आबिटकर यांना निवेदन डॉ. धनाजी राणे यांनी निवेदन दिले. यावेळी अशोक चराटी आदी उपस्थित होते.
-----------------
आजऱ्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावा
डॉ. धनाजी राणे यांच्यासह नागरिकांची आमदार आबिटकरांकडे मागणी
आजरा, ता. 1 ः आजरा तालु्क्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डाॅ. धनाजी राणे व नागरीकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन राधानगरी विधानसभेचे आमदार प्रकाश आबिटकर यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, ‘आजरा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे साळगाव फाटा ते नारायण बाग असा वळण रस्ता (बायपास) व्हावा. नबापुर ते सावरवाडी फाटा (महागाव व बेळगाव रस्त्याला जोडणारा) वळण रस्ता व्हावा. गोवा राज्याप्रमाणे काजूचा दर १५० रुपये प्रती किलो काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा. वन्यप्राण्यापासून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. जंगलाशेजारील शेतीला सौर कुंपनासाठी गोवा राज्याप्रमाणे अनुदान मिळावे. मौजे वेळवट्टी (ता. आजरा) येथील ग्रामपंचायत हद्दीतील शेतावरील घरामध्ये शेती फीडरऐवजी गावठाण फीडरवरून वीज पुरवठा करावा. हतीकडून बांबूची (मेसकाठीची) होणारे नुकसान मिळत नाही. तरी याबाबत कार्यवाही व्हावी. या वेळी अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक चराटी व नागरीक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com