आजऱ्यासाठी मुंबई बस पूर्ववत करा

आजऱ्यासाठी मुंबई बस पूर्ववत करा

आजऱ्यासाठी मुंबई बस पूर्ववत करा
दाभिल ग्रामपंचायत, आजरा तालुका सरपंच संघटनेतर्फे मागणी
आजरा, ता. १ ः आजरा तालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्थ मुंबई शहर व उपनगरामध्ये राहात आहेत. त्यांना गावी वारंवार यावे लागते. पूर्वी मुंबईला एसटीची सेवा सुरू होती; पण सध्या ती बंद असल्याने प्रवासी व ग्रामस्थांची कुचंबणा होत आहे, तरी मुंबईची एसटीची सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी दाभिल ग्रामपंचायत व आजरा तालुका सरपंच संघटनेच्या वतीने केली आहे. याबाबतचे निवेदन आजरा आगारप्रमुखांना देण्यात आले आहे.
मुंबई येथे राहणारे आजरा तालुक्यातील ग्रामस्थ उन्हाळी सुटी व सणाला गावी येतात. मुबंईतून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची व ग्रामस्थांची संख्या जास्त असते. यावेळी एसटीच्या गाड्यांची संख्या कमी असते. त्यामुळे त्यांना एसटी बदलत गावी यावे लागते. यामुळे त्यांचे हाल होतात. एसटी महामंडळ काही दिवसांसाठी सेवा देते, पण त्यानंतर ती बंद करते. अनेकदा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो; पण खासगी वाहनांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. महाराष्ट्र शासनाने नागरिकांसाठी एसटीतून प्रवासासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत; पण एसटीची सेवा सुरू नसल्याने प्रवासी व ग्रामस्थांना याचा लाभ होत नाही. प्रवासी व जनतेच्या गैरसोयीचा विचार करून आजरा आगाराने बससेवा पूर्ववत सुरू करावी. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, सरपंच संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी सरदेसाई, आजरा तालुकाध्यक्ष संदीप चौगुले, उपाध्यक्ष युवराज पाटील, नामदेव जाधव, सचिव धनाजी दळवी, समीर देसाई, महिला अध्यक्षा शारदा गुरव, कार्याध्यक्ष भारती डेळेकर, सचिव सुषमा पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com