शिव राज्याभिषेक चित्र अनावरण

शिव राज्याभिषेक चित्र अनावरण

रायगडावर होणार डॉ. चौगुले यांच्या
शिवराज्याभिषेक चित्राचे अनावरण

कोल्हापूर, ता. १ ः ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला (ता. ६) जूनला डॉ. अल्पना सोपान चौगुले यांनी रेखाटलेल्या शिवराज्याभिषेक या चित्राचे अनावरण व वितरण किल्ले रायगडावर होणार आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती व संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते प्रकाशन होईल, अशी माहिती डॉ. चौगुले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे प्रमुख उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण नव्यापिढीलाही राहावे, यासाठी डॉ. अल्पना यांनी चित्र रेखाटण्याचा विचार केला. त्यासाठी अनेक दिग्गज चित्रकारांच्या चित्रांचा अभ्यास केला. ज्येष्ठ चित्रकार मोहन वडणगेकर यांचे मार्गदर्शनही घेतले. तीन महिन्यात जलरंगात हे चित्र साकारले. मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनीही या चित्राची प्रशंसा केली. त्यानंतर छंदातील आनंद नावाने चित्र प्रदर्शनही भरवले गेले. इतिहासकार डॉ. मोरे, डॉ. इमाईल पठाण, डॉ. श्रीमंत कोकटे यांच्यापासून ते दिग्गज राजकीय नेत्यांना हे चित्र आवडले. शिवराज्याभिषेकाचे चित्र रेखाटणारी पहिली स्त्री म्हणून सर्वत्र विशेष कौतुक झाले. या चित्राचा पाठ्यपुस्तकात समावेश व्हावा, चित्राला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळावी यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. चौगुले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com