शासन आपल्या दारी उपक्रम बैठक बातमी

शासन आपल्या दारी उपक्रम बैठक बातमी

06430

‘शासन आपल्या दारी’ राज्याला
पथदर्शी ठरावा ःराहुल रेखावार

कोल्हापूर, ता. १ ः शासन आपल्या दारी हा उपक्रम ११ जूनला घ्यायचा आहे. यासाठी जिल्ह्याला ७५ हजार लाभार्थ्यांचे उद्दिष्ट दिले आहे. येथील हा उपक्रम राज्यात पथदर्शी ठरेल यासाठी परिश्रम घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. यामध्ये ते बोलत होते.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, जिल्हाधिकारी रेखावर म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी हा उपक्रम पूर्णपणे शासकीय कार्यक्रम असून या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे. गटविकास अधिकाऱ्यांनी दोन दिवसातून एकदा तर तहसीलदार यांनी रोजच्या रोज बैठका घेऊन लाभार्थ्यांची निवड मोठ्या प्रमाणावर होईल यासाठी प्रयत्न करावेत. निवडलेला लाभार्थी व त्याविषयीची माहिती तयार करुन विहित प्रपत्रात भरुन द्यावी. ही माहिती फक्त युनिकोड फॉन्टमध्येच भरुन ७ जूनपर्यंत द्यावी.’
पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, इचलकरंजी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, तहसीलदार स्वप्निल पवारउ पस्थित होते.

चौकट
९५ हजार लाभार्थी करण्याचा संकल्प
तालुका उद्दिष्ट
करवीर १० हजार
गगनबावडा ४ हजार
शिरोळ १० हजार
हातकणंगले १० हजार
पन्हाळा ८ हजार
शाहुवाडी ८ हजार
कागल ८ हजार
राधानागरी ८ हजार
आजरा ८ हजार
भुदरगड ७ हजार
चंदगड ७ हजार
गडहिंग्लज ७ हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com