''अंनिस''ने केले महिलेला जटामुक्त

''अंनिस''ने केले महिलेला जटामुक्त

gad25.jpg
06525
गडहिंग्लज : अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. सुभाष कोरे यांनी मालुताई खडके यांचे जटानिर्मूलन केले. याप्रसंगी अशोक मोहिते, प्रा. एस. आर. पाटील उपस्थित होते.
--------------------------------
‘अंनिस’ने केले महिलेला जटामुक्त
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या येथील शाखेतर्फे जटामुक्त अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत मूळच्या अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील व सध्या निपाणी येथे राहणाऱ्या महिलेचे जटानिर्मूलन केले. मालुताई खडके असे या जटामुक्त केलेल्या महिलेचे नाव आहे.
मालुताई खडके यांच्या केसात आजारपणात जट धरली. दिवसेंदिवस ती वाढतच जात होती. चार वर्षांपासून त्या त्रास सहन करीत होत्या. ‘देवीचा कोप होईल म्हणून जट काढू नका,’ असा सल्ला खडके कुटुंबीयांना अनेकांनी दिला होता. त्यांचा मुलगा युवराज यांनीही जट काढण्यासाठी अनेकांकडे विचारणा केली होती. मात्र, जटा काढण्यास कोणी तयार होत नव्हते. दरम्यान, प्रा. एस. आर. पाटील यांना ही परिस्थिती लक्षात आली. त्यांनी ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला.
‘अंनिस’चे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. प्रकाश भोईटे, गडहिंग्लज शाखेचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष कोरे, सल्लागार समिती सदस्य पांडुरंग करंबळकर, प्रधान सचिव अशोक मोहिते, अशोक घोरपडे यांनी पुढाकार घेत मालुताई खडके यांच्या जटांचे निर्मूलन केले. श्रीमती खडके यांचा मंगल पाटील यांच्या हस्ते साडीचोळी देऊन सत्कार केला. माधुरी खडके उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com