धोकादायक इमारत उतरवली

धोकादायक इमारत उतरवली

06536
कोल्हापूर : शिवाजी रोडवरील धोकादायक इमारतीतील गॅलरी उतरवताना महापालिकेची यंत्रणा. (नितीन जाधव सकाळ छायाचित्रसेवा)

शिवाजी रोडवरील धोकादायक
इमारत महापालिकेने उतरवली
कोल्हापूर, ता. २ : शिवाजी रोडवरील एका धोकादायक इमारतीची गॅलरी महापालिकेच्या यंत्रणेने उतरवली. त्यासाठी जेसीबी व बूमचा वापर करण्यात आला.
मोहन व शिवप्रसाद रामचंद्र उचले यांच्या मालकीची इमारत धोकादायक असल्याने ती उतरून घेण्याकरिता महापालिकेने चर्चा केली होती. मालकातर्फे योगेश निगवेकर यांनी महापालिकेची यंत्रणा, कर्मचारी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यानुसार इमारतीमधील कुळांच्या ताब्यात असलेली दोन दुकाने बंद करून बॅरिकेडस लावून जेसीबी व बूमच्या सहाय्याने धोकादायक गॅलरी उतरून घेण्यात आली. शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता नारायण भोसले, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, सागर शिंदे, पवडी, अग्निशमन विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com