सकाळ करियर व्याख्याने

सकाळ करियर व्याख्याने

करियर मार्गदर्शक व्याख्यांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद
तज्ञांशी संवाद, अविनाश धर्माधिकारी यांच्यासह तज्ञांची आजही व्याख्याने
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : सकाळ माध्यम समूह आयोजित संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत सकाळ एज्युकेशन महायात्रेला आजपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने आयोजित करियर मार्गदर्शक व्याख्यानांनाही विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. उद्या (ता. ४) आणि सोमवारी (ता. ५) दोन्ही दिवशी विविध विषयांवर तज्ञांची मार्गदर्शन सत्रे होणार आहेत. दरम्यान, कमला कॉलेज परिसरातील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतीभवनात प्रदर्शन व व्याख्यानमाला सुरू आहे.
-----------
६८४२
फिल्ममेकींगमध्ये कंटेट हाच
भविष्य असेल : अरूण प्रकाश
चित्रपट असो किंवा एकूणच मनोरंजनाच्या क्षेत्रात आता ‘कंटेट’ हेच भविष्य असणार आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांसाठी फिल्ममेकींगचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध होत असून त्याचा विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील करियरसाठी मोठा फायदा होणार असल्याचे स्पष्ट मत पुण्यातील एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अरूण प्रकाश यांनी व्यक्त केले. ‘फिल्ममेकींगमधील करियरच्या संधी’ या विषयावर त्यांनी संवाद साधला.
दरम्यान, कंटेट क्रिएटर्सना येत्या काळात वाढती मागणी राहणार आहे. सध्या सर्वाधिक पसंती व्हिडिओजना मिळते. साहजिकच व्हिडिओच्या माध्यमातून कंटेट क्रिएटर्सना अधिक संधी असेल, असेही ते म्हणाले.
नोकरीतील करियरच्या संधी आता कमी होत चालल्या आहेत. किंबहुना नोकरी करण्यापेक्षा नोकऱ्या देणारे करियर निवडण्याची मानसिकता दिवसेंदिवस वाढत असून ही स्वागतार्ह गोष्ट असल्याचे सांगून अरूण प्रकाश म्हणाले, ‘‘भारतातील फिल्ममेकींग आणि मनोरंजन क्षेत्राची व्यापकता इतकी व्यापक आहे की वर्षाला आपल्याकडे बाराशे ते दीड हजार सिनेमे तयार होतात. त्यामुळेच बॉलीवूडच्या नावानेही भारताची जगभरात ओळख आहे.’’
या क्षेत्रातील करियरच्या संधी ओळखूनच ‘एमआयटी- वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून फिल्ममेकींगमधील विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. फिल्ममेकींगमधील प्रत्येक विभागात अनेक संधी असून सिनेमॅटोग्राफी, डिरेक्शनपासून ते साऊंड डिझाईनपर्यंत अशा विविध विभागानुसार या अभ्यासक्रमांची रचना केली आहे. हे पदवी अभ्यासक्रम असून त्यासाठी विविध प्रकारच्या फेलोशिप, स्कॉलरशिपही उपलब्ध केल्या आहेत.’’
----------------
- अरूण प्रकाश सांगतात..
फिल्ममेकींगमध्ये सर्वाधिक करियरच्या संधी
व्हिडिओ कंटेट क्रिएटर्सना मागणी अधिक
भारतात वर्षाला बाराशे ते दीड हजार सिनेमांची निर्मिती
अभ्यासक्रमांसह फेलोशिप, स्कॉलरशिपही उपलब्ध
---------

06840
चिकाटीने काम केल्यास
आव्हानेच संधी : डॉ. हिरकुडे
आयुष्यातील स्वतःचे स्वप्न, आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आताच करिअरची दिशा निवडण्याची योग्य वेळ आहे. दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहेत. त्या साधण्यासाठी चिकाटीने कार्यरत राहिल्यास आव्हाने संधी बनतील आणि तुम्ही निश्‍चितपणे यशस्वी व्हाल, असा सल्ला संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. स्वप्नील हिरकुडे यांनी येथे दिला. त्यांनी ‘उच्चशिक्षणातील संधी व आव्हाने’ याविषयावर मार्गदर्शन केले.
मेडिसिन अँड अलाईड सायन्स, इंजिनिअरींग, आर्किटेक्चर, फार्मसी, लिबरल आर्टस, मॅनेजमेंट, कॉमर्स, सायन्स, आदी क्षेत्रात संशोधन, रोजगाराच्या अशा करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. त्या साधून यश मिळविण्यासाठी हार्डवर्क करावे. ज्ञान, स्वयंशिस्त, वेळेचे व्यवस्थापन या त्रिसुत्रीनुसार कार्यरत रहावे. पदवी-पदव्युत्तर शिक्षणाच्या सहा वर्षातील सवय पुढे आयुष्यभर टिकून राहते. त्यामुळे या कालावधीत करिअर घडविण्यावर भर द्यावा. शिक्षण घेण्यासाठी संस्थेची निवड करताना तेथील शैक्षणिक आणि भौतिक सुविधा, अभ्यासक्रमांचे स्वरूप, तज्ञ शिक्षक आहेत का?, प्रकल्पावर आधारित शिक्षण मिळते का? याची माहिती घ्यावी, असे डॉ. हिरकुडे यांनी सांगितले. त्यांनी संजय घोडावत युनिव्हर्सिटीतील अभ्यासक्रम, शैक्षणिक सुविधा, प्लेसमेंट, विविध उपक्रम, आदींची माहिती दिली.

डॉ. हिरकुडे सांगतात...
विद्यार्थ्यांनी आवड लक्षात घेवून करिअरची निवड करावी
आपल्या क्षमता आणि कमतरता जाणून घ्या
कमतरतांना क्षमता बनविल्यास विविध आव्हाने संधी बनतील
आपली पाल्ये कशात हुशार आहेत. ते शोधून पालकांनी बळ दिल्यास अधिक चांगले होईल
------------

06841
स्वभाव लक्षात घेवून
‘करिअर’ निवडा : नवले
कोल्हापूर, ता. ३ : स्वतःचा स्वभाव, आवड, पात्रता आणि क्षमता लक्षात घेवून करिअरचे क्षेत्र निवडा. कर्तृत्व केंद्रीत करिअर करा, पैसा आपोआप मिळेल. नकारात्मक विचार करू नका, असे आवाहन करिअर समुपदेशक प्रा. विजय नवले यांनी शनिवारी येथे केले. ‘सकाळ एज्युकेशन’ महायात्रेत त्यांनी ‘करिअरची सुयोग्य निवड’ याविषयावर मार्गदर्शन केले. आवड असलेल्या क्षेत्रामध्ये करिअर करावे. करिअरमधून मला काय मिळणार यापेक्षा मी काय देणार याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. अभ्यास असो की, काम त्यामध्ये सातत्य ठेवून त्या क्षेत्रातील तज्ञ व्हा. स्वतःचे स्वप्न दुसऱ्यांच्या नजरेतून बघू नये. ते टाळले, तर स्वतःसमोरील प्रश्‍नांची विविध उत्तरे सहजपणे मिळतील. ज्या क्षेत्रात कार्यरत राहाल, त्याठिकाणी समर्पित भावनेतून चांगले योगदान द्या. दहावी-बारावीनंतरचे शिक्षण घेताना अभ्यासातून मजा करा. त्याने पुढील आयुष्य तुमच्यासाठी यशाचे ‘रेड कारपेट’ होईल, असे प्रा. नवले यांनी सांगितले. विविध उदाहरणे देत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
----------
प्रा. नवले म्हणाले
वन टाईल स्ट्रगलचे करिअर लक्षात घ्या
सर्वांना बरोबर घेवून जाणारे करिअरचे क्षेत्र निवडा आणि त्यामध्ये झोकून द्या
प्लॅन ए आणि बी तयार ठेवा
स्वयंरोजगार, संशोधनात सर्वांसाठी संधी उपलब्ध आहेत
नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर रहा
मोबाईल हे करिअरला लागलेले पंक्चर आहे


06865,06873,06875,06876
आजची व्याख्याने
- सकाळी अकरा ते बारा : अभिजित कुलकर्णी (ब्रिलिएंट प्रोफेशनल ॲकॅडमी) : कॉमर्स आणि फायनान्समधील संधी
- दुपारी साडेतीन ते साडेचार : विवेक वेलणकर (प्रसिद्ध करिअर समुपदेशक) : दहावीनंतरची शाखा निवड
- सायंकाळी पाच ते सहा : स्क्वाड्रन लीडर सुप्रिया भोसले (निवृत्त एअरफोर्स ऑफिसर) : संरक्षण क्षेत्रातील संधी
- सायंकाळी सहा ते सात : डॉ. अविनाश धर्माधिकारी (चाणक्य मंडल परिवार) : दहावी, बारावीनंतरचे करिअर, स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्त्व विकासस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com