दहावी निकाल एकत्र

दहावी निकाल एकत्र

०१९६१
रेणुका सावंत, पृथ्वीराज चव्हाण, नक्षत्रा डवरी, वैष्णवी माने


मोहनलाल दोशी विद्यालयाची
निकालाची परंपरा कायम
नानीबाई चिखली : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून सहा दशकांची निकालाची परंपरा शाळेने यावर्षीही कायम राखली. विद्यालयातील १०० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ७८ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये तसेच ३९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व सात विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणी घेऊन यशस्वी झाले. यामध्ये रेणुका दयानंद सावंत ९६.८० टक्के गुण मिळवून अर्जुननगर केंद्रात व विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. पृथ्वीराज रविंद्र चव्हाण याने ९५.२० टक्के गुणासह द्वितीय, नक्षत्रा नवनाथ डवरी व वैष्णवी भारत माने यांनी ९४.६० टक्के गुणासह तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष शाह, उपाध्यक्षा प्रतिभा शाह, डॉ. तृप्ती शाह यांच्यासह सर्व संचालक पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभले. मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.
-------------------
02802
सुजाता तिरुके

मानव हायस्कूलचा निकाल ९६.८२ टक्के
सिद्धनेर्ली : शेंडूर येथील मानव हायस्कूल या शाळेचा निकाल ९६.८२ टक्के लागला. शाळेचे विशेष प्राविण्यमध्ये २७, प्रथम श्रेणीत २२, द्वितीय श्रेणीमध्ये १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेच्या सुजाता बळवंत तिरुके हिने ९६.६० टक्के गुण मिळवून सिद्धनेर्ली केंद्रात द्वितीय क्रमांक पटकाविला. गुणानुक्रमे इतर यशस्वी विद्यार्थी असे; निशा भगवान पवार (९५टक्के), पवन तानाजी कांबळे (९३.२०टक्के), सानिका शहाजी भांडवले (९१.८०टक्के), दीक्षा दिलीप निकम (९१टक्के).
-----------------
02150
अभयराज वारुषे, सृष्टी मोरे, भगवतीगौरी शेळके

रानडे विद्यालयाचा वारुषे तालुक्यात प्रथम
सेनापती कापशी : कोल्हापूरच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील न्यायमुर्ती रानडे विद्यालयाचा निकाल 97.87 टक्के लागला. विद्यालयाचा अभयराज कृष्णात वारुषे 98.60 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आला. कापशी केंद्रात पहिल्या तीन क्रमांकाचे विद्यार्थी याच शाळेचे आहेत. शाळेतील 52 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. द्वितीय क्रमांक सृष्टी कुंदन मोरे (98.00 टक्के), भगवतीगौरी भिमसेन शेळके हिने 94.60 टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक पटकावला. संस्थेच्या अध्यक्षा शिवानी देसाई, उपाध्यक्ष शिवाजी सावंत, सेक्रेटरी जयकुमार देसाई, डॉ. मंजिरी मोरे-देसाई, दौलत देसाई, बाळ डेळेकर यांचे प्रोत्साहन लाभले. मुख्याध्यापिका सविता कुलकर्णी व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
----------------
‘संजीवनी’ची निकालाची परंपरा कायम
पन्हाळा : संजीवन विद्यानिकेतन या निवासी शिक्षण संकुलाचा व संजीवन विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यानिकेतनमध्ये प्रथम क्रमांक यशराज सतीश काळे श्‍वेता दादासो टेकाळे या दोघांनाही (92.80), द्वितीय क्रमांक आदित्य चंद्रकांत भोसले (92.60) तृतीय क्रमांक संस्कार संदेश पावस्कर (87.40) चौथा नंबर शिवम सुनील शिवगण (87.20), तर पाचव्या क्रमांक धीरज धनंजय बारकुल आणि श्रेयस विजय गव्हाणे यांनी (87) मिळविला. 42 विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. 23 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. संजीवन विद्यालय या निवासीप्रशालेचा निकालही शंभर टक्के लागला. प्रशालेतून 30 विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त केली असून 21 विद्यार्थ्यानी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. विराज देवर्डेकर याने (91.60) प्रथम, अथर्व जगताप याने द्वितीय (89.60), विक्रांत गायकवाड व गुरूप्रसाद कवडे यांनी (89.40) तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, प्राचार्य महेश पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.
---------------

रघुनाथ हायस्कूलचा निकाल ९८.२२ टक्के
कसबा वाळवेः वाळवा एज्युकेशन सोसायटी वाळवा बुद्रुक संचलित, रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूल व भागशाळा अर्जुनवाडा व पिराचीवाडी प्रशालेचा निकाल ९८.२२ टक्के लागला असून ७४ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत यशस्वी झाले. २६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत यशस्वी झाले तर १० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमे विद्यार्थी असे - सेमी इंग्रजी माध्यम- सुरज शिंदे( ९३.४०), संध्या खोत(९२.६०), शुभम पाटील (९१.२०), अमृता भांदिगरे (९१), श्रुतिका पताडे (९०). - मराठी माध्यम -आसिया शिकलगार, मिताली संकपाळ (८८. ८०), श्रुतिका मोरे (८८.६०),ऋतुजा कांबळे (८८.४०), धनश्री पटकुरे (८८), उन्मेश तराळ (८७.६०) यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष आर. डी. पाटील, सचिव शिवराज पाटील, सहसचिव प्राचार्य व्ही. के. चौगले, पर्यवेक्षक सुनील मांडवकर आदींचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले.
------------------
‘खेबवडे’, बाचणी शाळेचा निकाल ९८ टक्के
कोल्हापूर ः दहावी परीक्षेमध्ये खेबवडे हायस्कूल खेबवडे व भाग शाळा बाचणी शाळेचा निकाल ९८.२२ टक्के निकाल लागला. गुणानुक्रमे विद्यार्थी असे- पूर्वा साठे (९१.६०),‍ सुहाना शहाणेदिवान (९१४०), विशाखा सारंग (९०.४०), स्वरुप कुंभार (८७.८०), पवनराज पाटील (८७.२०), संघमित्रा कांबळे (८६. ८०),
पायल मांडवकर (८५.६०), अमृता पाटील (८५.६०), श्रेया सोनाळकर (८४.४०), सानिका पाटील (८४), वैष्णवी निचीते (८४), तेजस पाटील (८३. ६०).
संस्थेचे अध्यक्ष आर. डी. पाटील, सचिव शिवरात पाटील, सहसचिव व्ही.के.चौगले, मुख्याध्यापक जे. के. पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.
----------
नरके स्कूलची ३९ वर्षाची परंपरा कायम
आपटी : नरके पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेने आपली ३९ वर्षाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. यशस्वी विद्यार्थी असे, सुदर्शन राजेश पवार (९३.८०) प्रथम, मधुरा पांडुरंग पाटील (९१.८०) द्वितीय, शिवराज सचिन पोवार (९०.६०) तृतीय. २४ विद्यार्थी विशेष श्रेणीत, तर १९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पन्हाळा विद्यामंदिर पन्हाळा शाळेचा निकाल ९८.६४ टक्के लागला. या शाळेतील २६ विद्यार्थी विशेष श्रेणीत, तर ३३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. संस्कार अविनाश लुपणे याने ९२ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक, संचिता किशोर भोसले ८९ टक्के मिळवून मुलींत पहिली, तर शाळेत दुसरी आली. श्रेयस माणिक मरंगाळे ८७.२० तिसरा आला.
-----------------
न्यू हायस्कूलचा निकाल ९३.५४ टक्के
आपटी : श्रुतिका कृष्णात माने (८७) प्रथम, शिराज शौकत मुल्ला (८३) द्वितीय, सानिया बशीर गडकरी (८१) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सात विद्यार्थी विशेष
श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. १० विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थेचे अध्यक्ष, सचिव व
पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
-----------
शाहुवाडी केंद्रातील चार शाळा १०० टक्के
बांबवडे : शाहुवाडी येथील केंद्रातील दहावीच्या परीक्षेचा चार शाळांचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये दि न्यु इंग्लिश स्कूल सुपात्रे निकाल १०० टक्के लागला
शाळेत प्रथम क्रमांक रूपाली हांडे (९२.२० टक्के), द्वितीय आर्या दाभोळकर (९१.२० टक्के), तृतीय दिक्षा हांडे (९०.४० टक्के) यांनी मिळविला. दरम्यान, डोणोली येथील यशवंत इंटरनॅशनल स्कुल, गोगवे (ता. शाहुवाडी) येथील श्री विलासराव शा. तळप पाटील. माध्यमिक विद्यालय, साळशी येथील शिवशंभु महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. शित्तुर येथील माध्यमिक विद्यालय शित्तुर तर्फे मलकापूर शाळेचा निकाल ९८ टक्के, पिशवी येथील उदयसिंगराव गायकवाड विद्यालयाचा निकाल ९८ टक्के, चरण येथील रामगीरी विद्यालयाचा निकाल ८५ टक्के, महात्मा गांधी विद्यालय बांबवडे चा निकाल ९७ टक्के लागला.
-------
सावेच्या न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल ९६ टक्के
बांबवडे : सावे येथील न्यू इंग्लिश स्कूलचा माध्यमिक शाळेचा निकाल ९६ टक्के इतका लागला. शाळेत प्रथम क्रमांक सानिया पाटील (८७.२०), द्वितीय साक्षी नलवडे (८५.२०), तृतीय हर्षवर्धन पाटील (८२.८०) याने मिळविला.
-----------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com