विद्यार्थ्यांनी जाणून घेतली करिअरची दिशा

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली करिअरची दिशा

फोटो-07368
-
(सकाळ एज्युकेशन महायात्रेचा लोगो वापरावा)

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली ‘करिअर’ची दिशा
सकाळ एज्युकेशन महायात्रेचा समारोप; तज्ज्ञांचे मार्गदर्शन ठरले उपयुक्त

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : करिअरचे अनेक पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध झालेल्या सकाळ एज्युकेशन महायात्रेचा सोमवारी विद्यार्थी, पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात समारोप झाला. विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी योग्य ठरणाऱ्या करिअरची दिशा या प्रदर्शनाच्या माध्यमातून जाणून घेतली. त्यांना करिअर गाईडन्स सेमिनार अंतर्गत विविध तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन उपयुक्त ठरले.
‘विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ हे ब्रीद घेवून सकाळ माध्यम समूहातर्फे संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत सकाळ एज्युकेशन महायात्रा हे शैक्षणिक प्रदर्शन येथील व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात घेण्यात आले. तीन दिवसांच्या महायात्रेत पुणे आणि राज्यभरातील नामवंत शिक्षण संस्थांनी करिअरच्या विविध पर्यायांची माहिती उपलब्ध करून दिली. महायात्रेच्या अखेरच्या दिवशी विद्यार्थी, पालकांनी विविध अभ्यासक्रमांची आणि शिक्षण संस्थांची सविस्तर माहिती घेतली. त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे प्रत्येक स्टॉलवरील प्रतिनिधींनी दिली. काही विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे प्राथमिक स्वरूपातील नोंदणीही केली. दुपारनंतर तज्ञांनी विविध विषयांवर विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन केले. अजिंक्य पंडत यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट
विविध अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षांची मिळाली माहिती
या महायात्रेत कनिष्ठ महाविद्यालयापासून ते कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेसच्या ‘केजी टू पीजी’ अभ्यासक्रमांसाठीचे स्टॉल होते. महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर शिक्षणाच्या उपलब्ध असणाऱ्या पर्यायांची माहिती, कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान, आदी विविध अभ्यासक्रमांच्या माहिती देण्यात आली. जेईई, नीट, सीईटी आदी स्पर्धा परीक्षांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

चौकट
या महायात्रेचे प्रायोजक
संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत फोर्ट इंटरनॅशनल डिफेन्स ॲकॅडमी- कोल्हापूर, एमआयटी-डब्ल्यूपीयू- पुणे पॉवर्ड बाय प्रदर्शनासाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- सांगली, संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट- मिरज, आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च सेंटर- विटा सहप्रायोजक होते. केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय- कोल्हापूर, संत गजानन महाराज ग्रुप ऑफ एज्युकेशन- गडहिंग्लज, नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट- पेठ, डीकेटीई- इचलकरंजी, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी- आष्टा, जे. जे. मगदूम ट्रस्ट हे डायमंड स्पॉन्सर होते.

चौकट
भाग्यवान विजेते
सकाळ एज्युकेशन महायात्रेला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यातील सोमवारच्या भाग्यवान विजेत्यांमध्ये प्रितम कुलकर्णी (साळगाव), संकेत उकलजी (टेंबलाईवाडी), सानिया साळुंखे (उचगाव), वरद पाटील (लाटवडे), साद बिजली (जवाहरनगर), साजन कुलकर्णी (कळंबा), शामल शिंगाटे (शिवाजीपेठ), कस्तुरी मनिष (कोल्हापूर), राजवर्धन यादव (शिरढोण), निसर्ग चव्हाण ( राजेंद्रनगर), वैष्णवी पोवार (कोल्हापूर), अक्षता कंबे (सावर्डे), श्रेयस चौगुले (राजारामपुरी), दीप पिसे (मंगळवारपेठ), ऋषिकेश जाधव (सानेगुरूजी वसाहत) यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com