बौध्दिक क्षमता जाणून घ्या

बौध्दिक क्षमता जाणून घ्या

07335

बौध्दिक क्षमता जाणून घेऊन
करिअर निवड करा ःप्रा. माने

पालकांनी स्वतःचे मत लादू नये

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः आयुष्यात यशस्वी होण्यासाठी करिअरची निवड काळजीपूर्वक करणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःची बौद्धिक क्षमता जाणून घेवून करिअर निवड करावी. पालकांनी स्वतःचे मत पाल्यांवर लादू नये. त्यांच्यावर विशिष्ट अभ्यासक्रम निवडीसाठी दबाव टाकू नये. त्यांचा कल जाणून घ्यावा, असे आवाहन संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रा. एस. जी. माने यांनी सोमवारी येथे केले. सकाळ एज्युकेशन महायात्रेत त्यांनी ‘अभियांत्रिकीमधील संधी’ याविषयावर मार्गदर्शन केले. सिव्हील, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक्ल, कॉम्प्युटर इंजिनिअरींग आदी आभियांत्रिकीमधील मुख्य शाखा आहेत. विविध क्षेत्रांतील तंत्रज्ञान वेगाने बदलत असून, त्यामुळे नव्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संधी उपलब्ध होत आहेत. त्या अचूकपणे टिपून यशस्वी करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाऊले टाकावीत. करिअरसाठी निवडलेल्या क्षेत्रात गुणवत्ता आणि अद्ययावत ज्ञानाच्या जोरावर वाटचाल करा. त्याने निश्‍चितपणे यश मिळेल, असा सल्ला प्रा. माने यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी त्यांच्या इन्स्टिट्यूटमधील अभ्यासक्रमांची, शैक्षणिक सुविधांची माहिती उपस्थितांना दिली.

प्रा. माने म्हणाले...
*अभ्यासक्रम निवडताना स्वतःची आवड लक्षात घ्या
*विद्यार्थ्यांनी पालकांचे मत, सल्ला आवर्जून घ्यावा
*इतर राज्य, देशांतील रोजगाराच्या संधींचा विचार करावा
*इंग्रजीचे ज्ञान अधिक चांगले करण्यावर भर द्यावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com