दिव्यांग संस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग संस्था
दिव्यांग संस्था

दिव्यांग संस्था

sakal_logo
By

अंपग बेरोजगार व पूर्नवसन
संस्थेतर्फे सोमवारी ठिय्या

कोल्हापूर ः संजय गांधी योजनेतील दिव्यांगाच्या मुलांच्या वयाची व वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करावी अशी मागणी अपंग बेरोजगार व पूर्नवसन संस्थेने यापूर्वी अनेकवेळा केली. मात्र, त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले. याच्या निषेधार्थ ११ जूनला तपोवन मैदानावर दिव्यांग व्यक्तींच्या सहभागाने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
संजय गांधी निराधार योजनेत दिव्यांगांच्या मुलासाठी विविध योजना आहेत. मात्र, त्यासाठी वयाची व वार्षिक उत्पन्नाच्या अटी जाचक असल्याने त्या रद्द कराव्यात अशी मागणी केली होती. त्यासाठी विविध खात्याचे मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदने दिली, आंदोलन केले. मात्र मागणी मान्य झालेली नसल्याने दिव्यांगाच्या मुलांना अनुदानाचा लाभ घेता येत नाही. त्यांना शासकीय नोकऱ्याही मिळत नाहीत. दिव्यांगाच्या कायद्यानुसार दिव्यांग व्यक्तीना शासकीय नोकऱ्या द्याव्यात, दिव्यांग कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी हे आंदोलन होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुमित शिंदे व सचिव संजय पोवार यांनी पत्रकाद्वारे दिली.