सकाळ नाट्य महोत्सव

सकाळ नाट्य महोत्सव

पडदा व सकाळ नाट्य महोत्सव लोगो- मंगळवारच्या टुडे एकवरून
..............
फोटो- 08248

हाऊसफुल्ल गर्दीतच महोत्सवाची सांगता
भाग्यवान रसिकांना आज पारितोषिक वितरण, ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक डॉ. शरद भुताडिया यांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः गेली तीन दिवस येथे रसिकांच्या सळसळत्या उत्साहात रंगलेल्या सकाळ नाट्य महोत्सवाची आज सांगता झाली. संकर्षण कऱ्हाडे लिखित, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘नियम व अटी लागू’ या नाटकालाही हाऊसफुल्ल गर्दी राहिली. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात हा महोत्सव रंगला. दरम्यान, माई ह्युंडाईतर्फे सलग तीन दिवस रसिकांसाठी सोडती झाल्या. त्यातली भाग्यवान विजेत्यांना उद्या (शुक्रवारी) माई ह्युंडाई शोरूममध्ये पारितोषिक वितरण होणार आहे.
महोत्सवाच्या सांगता समारंभात मराठी रंगभूमी व सिनेक्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक डॉ. शरद भुताडिया यांचा सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्या हस्ते विशेष सन्मान झाला. ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, चितळे डेअरीचे सरव्यवस्थापक शशिकांत कुलकर्णी, संदीप गद्रे, तनिष्क ज्वेलर्सचे संचालक प्रसाद कामत, जय कामत, माई ह्युंडाईचे राजन गुणे, शिव-समर्थ को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे शाखाधिकारी रणवीरसिंह निंबाळकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत कलाकारांचे सत्कार झाले.
चितळे डेअरी महोत्सवाचे मुख्य प्रायोजक, तर सहयोगी प्रायोजक तनिष्क ज्वेलर्स व यशवंत को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड (फलटण), माई ह्युंदाई, दि शिवसमर्थ मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (तळमावले, सातारा) उपस्थित होते. दरम्यान, संकर्षण कऱ्हाडे यांच्यासह अमृता देशमुख, प्रसाद बर्वे यांच्या नाटकात भूमिका होत्या. ऐश्वर्या बेहरे यांनी सूत्रसंचालन केले.

कोट
‘सकाळ’ने मराठी रंगभूमीसाठी नेहमीच मोठे योगदान दिले आहे. नाट्य महोत्सवाच्या माध्यमातून आता पुन्हा नव्या प्रयोगांचीही पर्वणी राज्यभरातील रसिकांना
मिळते आहे. एकूणच मराठी रंगभूमीवरील निर्मिती संस्था, कलाकार-तंत्रज्ञांसह रसिकांसाठीही असे महोत्सव येत्या काळात सकस समाजनिर्मितीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
- डॉ. शरद भुताडिया, ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com