राष्ट्रवादी पवार गट

राष्ट्रवादी पवार गट

Published on

शरद पवारांना मानणाऱ्या
कार्यकर्त्यांचा मेळावा घ्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मागणी

कोल्हापूर, ता. ६ ः राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या अजित पवारांनी चूक केली आहे. जो प्रकार झाला आहे तो योग्य नाही. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या पाठीशी असलेल्या नेते, कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यावा, अशा भावना राष्ट्रवादीतील शरद पवारांना मानणाऱ्या शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आज व्यक्त केल्या.
मुंबईतील बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर शहर अध्यक्ष आर. के. पोवार यांनी शहरातील काही निवडक पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत आज महाराणा प्रताप चौकातील कार्यालयात बैठक घेतली. त्यात घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यावेळी पोवार यांनी शरद पवारांबाबत जे काही घडले ते योग्य झालेले नाही. अजित पवारांनी केलेली चूक आहे. त्याबाबतची मांडणी कार्यकर्त्यांनी करावी, असे सांगितले. जयकुमार शिंदे यांनी जे पक्षातून बाहेर पडले ते ईडीला घाबरून गेले आहेत. अजित पवार हेच त्यासाठी सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या पाठीशी असलेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यावा, अशी मागणी केली. त्यानुसार लवकरच व्यापक बैठक घेतली जाईल, असे पोवार यांनी सांगितले. याबरोबरच अनिल घाटगे, सुनील देसाई यांनीही मते व्यक्त केली. जोतिराम बाचूळकर, किसन कल्याणकर, पूजा साळोखे, महादेव पाटील, फिरोज सरगुर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.