कृषी अधिकारी पदावरुन हटवले

कृषी अधिकारी पदावरुन हटवले

चंदगडच्या प्रभारी तालुका कृषी
अधिकाऱ्यांना पदावरुन हटवले

चंदगड, ता. २७ ः येथील प्रभारी तालुका कृषी अधिकारी विजय गंबरे यांच्या जागी अनिकेत माने यांची नियुक्ती करण्यात आली. माने यांनी आज आपला पदभार स्वीकारला. वरिष्ठ कार्यालयाला न कळवता गंबरे आठ- दहा दिवस गैरहजर होते. यासंदर्भात अॅड. संतोष मळवीकर यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी देशमुख यांनी ही कारवाई केली.
कामेवाडी (ता. चंदगड) येथील तरुणांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी अॅड. मळवीकर तालुका कृषी कार्यालयात गेले होते. त्यावेळी संबंधित अधिकारी गेले आठ- दहा दिवस कार्यालयात आले नसल्याचे सांगण्यात आले. त्यांनी गंबरे यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याकडे या पदाचा पदभार असल्याचे त्यांनी सांगितले. आजारी असल्याने रजेवर असल्याचे सांगितले. मग रजेच्या कालावधीत कोण काम बघते, असे विचारल्यावर त्यांना उत्तर देता आले नाही. यावर मळवीकर यांनी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी ही जबाबदारी गडहिंग्लज उपविभागीय कार्यालयाकडे असल्याचे सांगितले. तिथे संपर्क साधल्यावर गंबरे यांनी रजेबाबत आपल्याला कोणतीही कल्पना दिली नसल्याचे स्पष्ट केले. महत्वाच्या पदावर काम करणारे अधिकारी इतक्या बेफिकीरीने वागत असतील तर त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न मळवीकर यांनी केला. कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर आज गंबरे यांना या पदावरुन हटवण्यात आले. त्या जागी कागल येथून आलेले अनिकेत माने यांची नियुक्ती करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com