Manoj Jarange-Patil
Manoj Jarange-Patilesakal

Maratha Reservation : 'मनोज जरांगेंच्या कोल्हापुरातील सभेला एक लाख लोक जाणार'; दसरा चौकात 'या' दिवशी होणार सभा

जरांगे-पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत राज्य सरकारला आरक्षणाबाबत डेडलाईन दिली आहे.
Published on
Summary

सकल मराठा समाज शांततेच्या मार्गाने लढा देत आहे. याबाबत सरकारने योग्य तो मार्ग न काढल्यास उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.

आजरा : मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) हे कोल्हापूर येथे शुक्रवारी (ता. १७) छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन करण्यासाठी येत आहेत. त्यानंतर दसरा चौकात होणाऱ्या सभेला आजरा, भुदरगड, राधानगरी, चंदगड व गडहिंग्लज या पाच तालुक्यांतून एक लाख जण उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक मारुती मोरे यांनी दिली.

Manoj Jarange-Patil
Uday Samant : महाराष्ट्रातील 215 आमदारकीच्या आणि लोकसभेच्या 45 जागा आम्ही सहज जिंकू - उदय सामंत

येथील जनता गृहतारण संस्थेमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने (Maratha Reservation) पत्रकार बैठक झाली. यावेळी त्यांनी माहिती दिली. जरांगे-पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत राज्य सरकारला आरक्षणाबाबत डेडलाईन दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकल मराठा समाज शांततेच्या मार्गाने लढा देत आहे. याबाबत सरकारने योग्य तो मार्ग न काढल्यास उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.

Manoj Jarange-Patil
Loksabha Election : लोकसभा जिंकण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन! 'या' खासदारांचं कापणार तिकीट, कोणाला मिळणार संधी?

सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल. आमच्या या लढ्यात बारा बलुतेदारसह समाजातील सर्व घटक सहभागी झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. बंडोपंत चव्हाण, प्रकाश देसाई, शंकरराव शिंदे, शिवाजी पाटील, शिवाजी इंजल, चंद्रकांत पारपोलकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com