मटार, गाजराची आवक वाढली

मटार, गाजराची आवक वाढली

gad1724.jpg
51773
गडहिंग्लज : मंडईत मटारचे दर कमी असून ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी आहे. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
-----------------------------

मटार, गाजराची आवक वाढली
कोंथबिर वधारली : वरणा, बिन्स तेजीत; संत्री, बोरे स्वस्त
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : येथील भाजीमंडईत मटार, गाजराची आवक वाढली आहे. तुलनेत कोंथबिरीची आवक कमी झाल्याने भाव वधारले होते. पंधरवड्यापासून वरणा, बिन्सच्या दरातील तेजी टिकून आहे. फळबाजारात नागपूरची संत्री आणि सोलापूरची बोरांची अधिक आवक झाल्याने दर स्वस्त आहेत. जनावरांच्या बाजारात म्हैशींची अधिक आवक आहे.
मंडईत मटारची अधिक आवक आहे. यामुळे दर उतरला आहे. किलोचा ४० ते ६० रुपये दर झाला. लालभडक गाजराची आवक असून दरही कमी आहेत. चाळीस रुपये किलो दर आहे. प्लॉवर, बिन्स, वरण्याचे दर दहा किलोमागे १०० रुपयांनी वाढले आहेत. कोंथबिरीचा शंभर पेंढ्याचा दर ३०० रुपयांनी वाढून हजारवर स्थिरावली. पेंढीचा दर बारा ते पंधरा रुपये होता.
पालेभाज्या दहा रुपये पेंढी अशी विक्री सुरु होती. वातावरणातील थंडीमुळे काकडी, लिबूंचे दर कमी झाले आहेत. ऊस तोडणी सुरु झाल्याने कांदा, मिरचीची रोप लावण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. ब्याळकूड (ता. चिकोडी) येथील सुमारे पंधराहून अधिक रोप विक्रेते आले होते. रोपांच्या पेंढीचा २० ते ५० रुपयांपर्यंत जातीनुसार दर होते. फळबाजारात संत्री, बोरांची अधिक आवक झाल्याने किलोचा दर ४० रुपये असा उतरला आहे. सफरचंद, डाळींब, सिताफळ १०० रुपये किलो होते. जनावरांच्या बाजारात म्हैशींची अधिक आवक आहे. सुमारे शंभरहून अधिक आवक होऊन चाळीस हजार ते लाख रुपयापर्यंत दर असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. शेळ्या मेंढ्यांची पन्नासहून अधिक आवक नोंदून १० ते १५ हजारापर्यंत दर होते.
-------------------
हरभरा भाजी
भाजी मंडईत हरभरा भाजी दाखल झाली आहे. आवक जेमतेम असल्याने दर अधिक आहेत. ग्राहकांची हरभरा भाजीला अधिक मागणी असते. थेट उत्पादकच विक्री करीत असल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात ढिगाला दहा ते पंधरा रुपये दर आहे.
---------------
* बाजार दृष्टीक्षेपात
- वांगी, हिरवी मिरची, ढब्बूचे दर स्थीर
- कांदा, बटाट्याचे दर कायम
- टोमॅटो, कोबी आवक अधिक
- कलिंगड दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com