रुपाली चाकणकरांचा अमोल कोल्हेंना थेट इशारा; म्हणाल्या, 'स्वत:च्या मतदारसंघात संपर्क नसलेला खासदार..'

'उमेदवार कोणीही असोत, या जागेवर स्वत: अजित पवार उभे आहेत, असे समजून कार्यकर्ते काम करतील.'
Rupali Chakankar vs Amol Kolhe
Rupali Chakankar vs Amol Kolheesakal
Published on
Summary

'दररोज होणारे पक्षप्रवेश पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.'

कोल्हापूर : ‘आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा (Ajit Pawar Group) ला मिळणाऱ्या जागांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उमेदवार जाहीर केले जातील. त्यामुळे उमेदवार कोणीही असोत, या जागेवर स्वत: अजित पवार उभे आहेत, असे समजून कार्यकर्ते काम करतील’, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा (अजित पवार गट) च्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Rupali Chakankar vs Amol Kolhe
'शाहू छत्रपती महाराज सर्वांसाठीच आदर्श, पण 'महायुती'च्या उमेदवारासाठी आम्ही हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करू'

तसेच ‘स्वत:च्या मतदारसंघात संपर्क नसलेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) निवडणुकीसाठी माझ्याविरोधात विरोधकांकडे उमेदवार नाही, असे हास्यास्पद विधान करू नये’, असा टोलाही चाकणकर यांनी लगावला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर त्यांनी प्रसिध्दीमाध्यमांशी संवाद साधला.

Rupali Chakankar vs Amol Kolhe
विधानसभा-कारखाना अध्यक्षपदाचा शब्द दिला आणि हसन मुश्रीफ, केपी पाटलांनी मला फसवलं; कोणी केलाय आरोप?

चाकणकर म्हणाल्या, ‘येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) चांगले यश मिळेल, असा आत्मविश्‍वास आहे. त्याचे कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली विकासकामे व कार्यकर्त्यांना दिलेला न्याय होय. पवार यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले आहे. दररोज होणारे पक्षप्रवेश पाहता विरेाधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अजित पवार यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले, अशा अफवा पसरवित आहेत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ajit Pawar
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Marathi News Esakal
www.esakal.com