

लोगो ः कर्णबधीर दिन विशेष
कॉक्लिअर इन्प्लांट तंत्रज्ञानाची प्रतीक्षाच
शासकीय रुग्णालयांत सुविधा नसल्याने कर्णबधीरांच्या वाचा विकासाला अडसर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ,ता. ३ ः प्रगत तंत्रज्ञानांमुळे जन्मताच कर्णबधीर असलेल्यांची श्रवणा क्षमता वाढवून वाचा विकास घडविणारे कॉक्लिअर इन्प्लांट तंत्रज्ञान वापरात येत आहे. मात्र, अनेक वर्षापासून येथील शासकीय रुग्णालयांना या तंत्रज्ञानाची प्रतीक्षा आहे. परिणामी जिल्ह्यातील नव्याने जन्माला येणाऱ्या कर्णबधीरांच्या वाचा विकासाला अडसर येत आहे.
कान चांगला असेल तर ध्वनी लहरीं मेंदूपर्यंत पोहचून ऐकता येते, ऐकण्यामुळे वाचा विकास घडतो. मात्र ऐकण्यात दोष असेल तर वाचा विकासाला खीळ बसते म्हणून श्रवणाद्वारे जग अनुभवण्यासाठी कानाचे महत्व वेळीच समजून घेण्याची गरज आहे.
जिल्हाभरात कर्णबधीरांच्या संख्या जवळपास साडेसात हजारांच्या घरात आहे. जवळपास २७ कर्णबधिरांच्या शाळा आहेत. यात ७ वर्षेत २० वर्षांपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बहुतांशजणांवर यापूर्वी उपचार झाले. बहुतेकांना श्रवणयंत्रणा वापरावी लागत आहे. पूर्वीच्या काळात एखादे बाळ जन्माला आल्यानंतर ते कर्णबधिर आहे की नाही समजण्यासाठी किमान तीन चार वर्षे जात होती. त्यामुळे वेळीच तपासणी उपचार घेतले जात नव्हते. यामुळे अनेकांचा वाचा विकास झाला नाही एकूच येत नाही. त्यामुळे बोलता येत नाही अशी स्थिती झाली.
नव्या काळात कॉक्लिअर तंत्रज्ञान आले आहे त्यामुळे जन्मलेले बाळाला कितपत आवाज ऐकू येतो, यांची तीव्रता समजून घेता येते. एकु येत नसले तरी कॉक्लिअर तंत्रज्ञाना आधारीत उपचारातून श्रवण क्षमता वाढवली जाते. तसेच स्पिच थेरिपीसारख्या यामाध्यमातून कर्णबधीरांना बोलण्यास शिकवले जाते या प्रकारातील उपचार सेवा मुंबई, बेंगोलर, हैदराबाद आदी बड्या शहरातील आल्या आहेत, तर तसेच खासगी वैद्यकीय क्षेत्रातही नवीन तंत्रज्ञान येत आहे. मात्र यात उपचाराचा खर्च काही लाखाच्या घरात आहे त्यामुळे गरजू घटकांतील लोकांना त्याचा लाभ घेणे मुश्कील होत. अशा स्थितीत शासकीय रुग्णालयात कॉक्लिअर इन्प्लांट सुविधा लवकर व्हावी यासाठी विविधस्तरावर सक्षम पाठपुरावा होण्याची आवश्यकता आहे.
कोट
कान, नाक, घसा विभागात अद्यायावत मॉड्यूलर ओटीची सुविधा आहे. त्यासोबत कॉक्लिअर इन्प्लांट सुविधा करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करत आहोत. येणाऱ्या काळात अशी सुविधा सीपीआरमध्ये उपलब्ध झाल्यास त्याचा लाभ येथील गरजू घटकांतील कर्णबधीरांना होईल.
-डॉ. अजित लोकरे, कान घसा विभागा प्रमुख सीपीआर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.