स्वमग्नता जनजागृती फेरी

स्वमग्नता जनजागृती फेरी

75206
कोल्हापूर : अमन फाउंडेशनतर्फे स्वमग्नता जनजागृतीपर फेरी काढण्यात आली.

‘अमन फाउंडेशन’तर्फे
स्वमग्नता जनजागृती फेरी
कोल्हापूर, ता. ४ : येथील अमन फाउंडेशनतर्फे ‘स्वमग्नता दिना’निमित्त जनजागृती फेरी व पथनाट्याचे सादरीकरण झाले. राजारामपुरी परिसरात हा उपक्रम झाला. स्वमग्नतेची लक्षणे, समज-गैरसमज, उपचार शिक्षण आदी माहितीचे फलक हातात घेऊन प्रबोधन करण्यात आले.
स्वमग्नतेचे निदान जितक्या लवकर होईल, तितका मुलांमध्ये विकास होण्याची शक्यता जास्त असते. अशा मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या अनुषंगाने मुले व पालक यांच्या सहभागातून राजहंस या पथनाट्याचे सादरीकरण झाले. फेरीची सांगता राजाराम उद्यानात झाली. अमन फाउंडेशनच्या संस्थापक दीपा शिपुरकर, बंडा पेडणेकर, संदीप पाटील, कपिल मुळे यांनी संयोजन केले. क्रांतिसिंह पाटील, अभिजित रोटे, सुनीता करंजवडेकर, अमृता भारती, प्रचिती पेंढारकर, वेद मुळे, आरोही खाबडे यांचा पथनाट्यात सहभाग होता. ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश शिपूरकर, डॉ. ऋषिकेश पोळ, विनायक देसाई, विजय धर्माधिकारी, दीपाली जाधव, सविता खाबडे, सूरज मोहिते, मकरंद चौधरी, निरंजन देशपांडे, पल्लवी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com