नवीन १४०० ईव्हीएमचे शनिवारी होणार वाटप

नवीन १४०० ईव्हीएमचे शनिवारी होणार वाटप

जादा १४०० ‘ईव्हीएम’चे
उद्या होणार वाटप

कोल्हापूर, ता. २५ : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार व हातकणंगले मतदारसंघात २७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे आणखी १४०० ईव्हीएम मशीन ठाणे येथून मागविली आहेत. त्या मशीनची राजाराम तलाव येथील शासकीय गोदाम येथे प्रथमस्तरीय तपासणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर शनिवारी (ता. २७) संबंधित विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठविली जाणार आहेत.
दोन्ही लोकसभा मतदारसंघांत १५ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात राहिल्याने प्रत्येक केंद्रावर दोन ईव्हीएम मशीन लागणार आहेत. त्यामुळे जादा मशीनची आवश्‍यकता भासणार आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी ठाणे येथून १४०० आणखी जादा ईव्हीएम देण्यात आली. त्याची प्रथमस्तरीय तपासणी सुरू आहे. त्यानंतर त्या मशीनचे रँडमायझेशन (सरमिसळ) होणार असून, शनिवारी (ता. २७) त्याचे विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर मंगळवार (ता. ३०) पर्यंत पुन्हा रँडमायझेशन करून ही मशीन उमेदवारांच्या नावासह तयार करून ठेवली जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com