कोवाडे, पेद्रेवाडी, सुळेत महालक्ष्मी यात्रेची तयारी

कोवाडे, पेद्रेवाडी, सुळेत महालक्ष्मी यात्रेची तयारी

ajr252.jpg.....
79813
कोवाडे (ता. आजरा ) ः येथे घराची रंगरंगोटी करताना ग्रामस्थ. (छायाचित्र ः सुभाष पोवार कोवाडे)
-------------------------
कोवाडे, पेद्रेवाडी, सुळेत महालक्ष्मी यात्रेची तयारी
घराची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात ः विविध कार्यक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
भादवण, ता. २६ ः कोवाडे, पेद्रेवाडी व सुळे या गावांची महालक्ष्मीदेवीची यात्रा मंगळवार (ता. ३०) पासून सुरू होत आहे. यासाठी ग्रामस्थांकडून जय्यत तयारी सुरू केली आहे. घरांची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात आली आहे. यात्रेनिमित्त क्रीडा स्पर्धा, बैलगाडी शर्यत, घोडागाडी, सायकल स्पर्धा व मनोरंजनाचे कार्यक्रम होत आहेत. यात्रा समिती व संबंधित गावच्या ग्रामपंचायतीने नियोजन घातले असून गावाला उत्साहाचे स्वरुप आले आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर व बाहेरगावी नोकरी व व्यवसायानिमित्त असलेले ग्रामस्थ गावी परतत आहेत.
कोवाडे, पेद्रेवाडी व पेद्रेवाडी यात्रा २१ वर्षांनंतर होत आहे. सुळेची यात्रा १९ वर्षांनंतर होत आहे. ग्रामपंचायतीने गावात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. यात्रेनिमित्त पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जात आहे. कोवाडे, पेद्रेवाडी, दाभेवाडी व सुळेच्या यात्रेला मंगळवारी (ता. ३०) सुरुवात होत आहे. ती तीन दिवस चालणार आहे. पारंपरिक प्रथेप्रमाणे आज इरडे पडण्याचा कार्यक्रम झाला. गावातून मिरवणूक काढली. पारंपरिक प्रथाचे पालन करण्याचे आवाहन केले. कोवाडे- दाभेवाडी व पेद्रेवाडी व सुळेत मंदिरांची रंगरंगोटी केली आहे. घरांची रंगरंगोटीत ग्रामस्थ व्यस्त असून अंतिम टप्प्यात आली आहे. यात्रेचे साहित्य खरेदी, कपडेलत्ते खरेदी सुरू केली आहे. सुळेत क्रिकेट, कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले आहे. मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मंगळवारी रात्री रथावरची लक्ष्मी खेळण्याचा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्रम होतील. बुधवार (ता.१) स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल. कोवाडे येथे क्रिक्रेट, दौड, रस्सीखेच, बैलगाडी शर्यत, एका हाताने बैल पळवणे, घोडागाडी, सायकल स्पर्धांचे आयोजन केले आहे. मनोरंजन कार्यक्रम होत आहे. मंगळवारी रात्री हातावरची लक्ष्मी खेळण्याचा कार्यक्रम होईल. बुधवारी (ता१) स्नेहभोजनाचे आयोजन केले जाणार आहे. याच दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम होतील. यात्रा समिती, ग्रामस्थ, मुंबईकर ग्रामस्थ व तरुण मंडळे नियोजनात व्यस्त आहेत.
-------------
इरडे पडण्याचा कार्यक्रम
कोवाडे या गावात आज इरडे पडण्याचा कार्यक्रम झाला. यानिमित्त गावात मिरवणूक काढली. देवस्थान समितीने पारंपारिक प्रथांचे पालन करण्याचे आवाहन केले. विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, मुंबईकर मंडळ व तरुण मंडळे उपस्थित होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com