अंधारात खांबावर चढून दुरुस्ती करताना वीज कर्मचारी.
अंधारात खांबावर चढून दुरुस्ती करताना वीज कर्मचारी.esakal

Kolhapur: रात्रीची वेळ... गव्यांची भीती अन् कर्मचाऱ्यांची कसोटी, आजऱ्यासह ६५ गावांत तब्बल १० तासांनी वीज

आजऱ्यासह ६५ गावांत तब्बल १० तासांनी वीज : वीजपुरवठा खंडित

सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २६ ः रात्रीची वेळ....काळाकुट्ट अंधार.... समोरचे काहीही दिसत नव्हते. त्यात जंगलचा परिसर गव्यांचा कळप कधीही येईल, अशी स्थिती असताना आजरा वीजवितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सुहास मिसाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रभर प्रयत्न करून वीजपुरवठा सुरळीत केला.

गुरुवारी (ता. २५) झालेल्या वादळी वाऱ्यांच्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. आजरा शहरासह ६५ गावे अंधारात म्हणजे जवळपास निम्माहून अधिक तालुका अंधारात होता. कर्मचाऱ्यांनी वादळ, वारा, पाऊस, गवे या कशाचीही तमा न बाळगता वीजपुरवठा सुरळीत केला. त्यांच्या प्रयत्नाचे कौतुक होत आहे.

आजरा शहर व परिसरात गुरुवारी (ता. २५) झालेल्या वादळी वारे व विजेच्या कडकडाटांसह झालेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. आजरा सूतगिरणीजवळ ३३ केव्ही वीज वाहिनीवर वीज कोसळल्यामुळे आजरा शहरासह ६५ गावे अंधारात गेली. आजऱ्याचे उपकार्यकारी अभियंता मिसाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रीची वेळ, गव्यांची भीती याची तमा न बाळगता प्रयत्न सुरू केले. वीज वाहिनीवर वीज पडल्यामुळे तांत्रिक बिघाड झाला होता.

सुलगावच्या जंगल भागातच हा बिघाड झाला होता. वादळ, पाऊस गवे यासारख्या वन्यप्राण्याची भीती असताना वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसह पंचवीस कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्रभर प्रयत्नशील होते. सुमारे दहा तासानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. सहायक अभियंता शरद पाटील, निखिल मोगरे, विनायक खोत, भरत सोनार, उतम नाईक, सुनील पाटील, गजानन सरंबळकर, अमोल पोवार, नागोजी रेडेकर, निरंजन गुरव आदी सहभागी झाले होते.

उपाशी पोटी प्रयत्न

वीजपुरवठा खंडित झाल्यावर अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धावले. जंगलात त्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी काम सुरू केले. वीजपुरवठा सुरळीत करताना किती वेळ जाईल हे सांगता येत नव्हते. उपाशी पोटी त्यांचे प्रयत्न सुरू होते. वीजपुरवठा सुरू झाल्याने नागरिकांनी निश्वास सोडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com